सामाजिक न्यायाचा विचार नसलेला दलित आदिवासींची उपेक्षा करणारा राज्याचा अर्थसंकल्प - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 12 March 2022

सामाजिक न्यायाचा विचार नसलेला दलित आदिवासींची उपेक्षा करणारा राज्याचा अर्थसंकल्प - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

 मुंबई दि. 12 -  उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री  अजित पवार यांनी सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा दलित आदिवासींची उपेक्षा करणारा आणि सामाजिक न्यायाचा विचार नसलेला अर्थसंकल्प आहे अशी टीका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी  केली आहे. 
राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प आहे 24 हजार 353 कोटींचा त्रुटीचा ; ठरेल महाविकास आघाडी च्या नशीब फुटीचा अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया ना. रामदास आठवले यांनी दिली आहे. 


राज्यसरकार ने सीएनजी चा टॅक्स कमी केला त्याप्रमाणे पेट्रोल डिझेल वरील राज्य सरकार चे विविध टॅक्स महाविकास आघाडी ने कमी करावेत म्हणजे राज्यात पेट्रोल डिझेल स्वस्त होईल.राज्य सरकार ने  यंदाचा अर्थसंकल्प हा केवळ  तूटीचा आहे पण तो भ्रष्टाचाऱ्यांसाठी लुटीचा ठरू नये असे ना रामदास आठवले म्हणाले.

 


              

No comments:

Post a Comment

Pages