काँग्रेस अनुसूचित जाती कमिटीच्या वतीने माध्यम सक्षरते वर कार्यशाळा फॅक्टशाळा प्रशिक्षक डॉ.मनीष जैसल करणार मार्गदर्शन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 12 March 2022

काँग्रेस अनुसूचित जाती कमिटीच्या वतीने माध्यम सक्षरते वर कार्यशाळा फॅक्टशाळा प्रशिक्षक डॉ.मनीष जैसल करणार मार्गदर्शन

औरंगाबाद : येथील काँग्रेस अनुसूचित जाती कमिटी अंतर्गत माध्यम साक्षरता आणि फेक न्युज या विषयावर गुगलच्या सहकार्याने फॅक्टशाळा अंतर्गत ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारला गुगल फॅक्टशाळेचे प्रशिक्षक व आईटीएम विद्यापीठ ग्वालीयर येथील पत्रकारिता विषयाचे डॉ. मनीष जैसल  मार्गदर्शन करणार आहेत तर अरुण शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, हा वेबिनार, 16 मार्च 2022 बुधवार रोजी सायंकाळी  सहा ते आठ या वेळेत ऑनलाईन गुगल मिटच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत,भारतातील प्रत्येक नागरिकाला माध्यम साक्षरता, बनावट बातम्या व चुकीच्या माहितीचे प्रकाशन व प्रसारण ओळखता यावे, समजावे व जागरूक व्हावे या उद्देशाने भारतभर अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन गुगलच्या फॅक्टशाळा उपक्रमांतर्गत राबविण्यात येत आहे,चुकीच्या माहीती विरोधातील लढा या संकल्पनेखाली ऑनलाईनद्वारे यांमधून लोकांमध्ये जागरूकता व सजगता निर्माण व्हावी या उद्देशाने हे प्रशिक्षण शिबीर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे, जास्तीत जास्त सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी, विद्यार्थी, माध्यम क्षेत्रातील अभ्यासक व संशोधकांनी याचा लाभ घेऊन सहभागी होण्याचे आवाहन वेबिनार समन्वयक डॉ. मिलिंद आठवले यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages