किनवट, दि.२० : जम्बो ऑक्सिजन सिलेंडर व एक्स रे युनिट चा लोकार्पण सोहळा सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तिकिरण पुजार यांच्या हस्ते साने गुरुजी रुग्णालयात नुकताच संपन्न झाला.यावेळी गंगन्ना नेम्मानीवार,डॉ. शिरिष पत्की,अनुराग भस्मे,धरमसिंग राठोड,प्राचार्य डॉ. आनंद भंडारे व नारायणराव सिडाम यांची मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.रुग्णालयास ऑक्सिजन सिलेंडर एस.बी.आय.बँकेने, तर एक्सरे युनिट स्व.सदाबाई नथमलजी बलदोटा सम्रतीप्रीत्यर्थ पुण्याच्या बलदोटा परिवाराने भेट दिले आहे.
प्रास्ताविक साने गुरुजी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अशोक बेलखोडे यांनी केले.यावेळी वनाधिकारी श्री.खैरनार यांचे शुभेच्छा पर भाषण झाले.याच कार्यक्रमात पोलिस उप निरिक्षक झाल्याबद्दल सुप्रिया सुरेंद्र राठोड हिचा उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन नितिन टापरे यांनी केले.पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आभार प्रदर्शन माजी नगराध्यक्ष के.मुर्ती यांनी केले.यावेळी प्रा.डॉ. आनंद भालेराव,शिवराज राघुमामा, संतोष तिरमनवार,डॉ. शिवाजी गायकवाड, डॉ. किरण नेम्मानीवार, श्री.घुगे,वनाधिकारी श्री.आटपाटकर, विनायक गव्हाणे,वसंत पवार,अनिल सुर्यवंशी, म.आ.चौधरी,आशिष देशपांडे, सुरेंद्र राठोड, गंगाधर कदम,मिलिंद सर्पे, नसिर तगाले यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.यशस्वितेसाठी संजय बोल्लेनवार,द्यानेश्वर ऊईके,डॉ. काळे,श्री. दमन्ना,तेजस्विनी यांनी पुढाकार घेतला.
No comments:
Post a Comment