वसमत :
कुरुंदा गावात होळी च्या निमित्ताने महापुरुषांना अभिवादन करून मानवी जिवनात भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे प्रतिकात्मक दहन करून तरुण युवकांच्या पुढाकारातून नव्या स्वरूपात होळी सण साजरा करण्यात आला.
बेरोजगारी, महागाई, महिला अत्याचार,जातीयता,धार्मिक तेढ,शेतकरी आत्महत्या, अपुऱ्या आरोग्य सेवा,भ्रष्टाचार, बलात्कार, आर्थिक असमानता,लैंगिक विषमता आशा अनेक सामाजिक प्रश्नांची पोस्टर हातात धरून त्यांचा निषेध करत कागदी होळी पेटवून त्यात त्याचं दहन करण्यात आले.
कार्यक्रमाला गावातील गावकरी तसेच तरुण युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,तरुण मित्रांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जय विजय लोखंडे यांनी केले.
No comments:
Post a Comment