नांदेड प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते बबन माघाडे यांच्या दुसऱ्या निर्वाण रथाचे लोकार्पण शहरातील शासकीय विश्रामगृहात समोर आज करण्यात आले.
सर्वसामान्य जनतेतील मयताला त्यांच्या राहत्या घरून स्मशानभूमीपर्यंत नेता यावे म्हणून नांदेड शहरातील बबन महागडे यांनी दुसरा निर्वाण रथ सुरू केलेला आहे. या रथाचे लोकार्पण वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि सर्व बहुजनांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 4 मार्च रोजी शहरातील शासकीय विश्रामगृहासमोर लोकार्पण करण्यात येऊन त्यांच्या रथाला बाळासाहेबांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली. यावेळी अंजलीताई आंबेडकर, प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, राज्य प्रवक्ते फारूक अहेमद, नांदेड जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, शहराध्यक्ष गायकवाड, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते, सुनील सोनसळे, केशव कांबळे, मुन्ना इंगोले यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment