भडकलगेट येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची वाढवा; आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचे महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 4 March 2022

भडकलगेट येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची वाढवा; आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचे महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन

औरंगाबाद :

९ जानेवारी २०१३ रोजी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याच्या ठरावाची अंमलबजावणी करावी ह्या मागणीसाठी आज आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीच्या वतीने महानगरपालिकेच्या मुख्य इमारती समोर जोरदार आंदोलन करण्यात आले.


तत्कालीन नगरसेवक मिलिंद दाभाडे ह्यांनी या बाबतचा ठराव विषय क्रं ९१ नुसार मांडला होता.व त्यास सभागृहात मंजुरी देखील मिळाली होती परंतु मनपा प्रशासनाने ह्याकडे दुर्लक्ष केल्याने ही मागणी अद्यापही प्रलंबित असल्याने आज आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पुतळ्याची उंची वाढविण्याची मागणी लावून धरली.

अतिरिक्त आयुक्त भालचंद्र नेमाने ह्यांनी आंदोलनस्थळी जाऊन निवेदन स्वीकारले व सोमवारी प्रशासक आस्तिककुमार पांडे हे आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा करणार  आहेत तसेच ह्या मागणीबाबत प्रशासन सकारात्मक असल्याचे असल्याचे त्यांनी सांगितले.

 यावेळी समितीचे मुख्य निमंत्रक श्रावण गायकवाड,प्रकाश निकाळजे,मिलिंद दाभाडे,कृष्णा बनकर,विजयकुमार खंडागळे,संजय ठोकळ,शांतीलाल गायकवाड,राजू अमराव,कैलास गायकवाड,पंडित नवगिरे,विजय मगरे,संतोष भिंगारे,ऍड.धंनजय बोरडे,किशोर गडकर,अनिल सदाशिवे,नंदू बनकर,बाबा तायडे,गुल्लू वाकेकर,सुनील सोनवणे,सचिन निकम,प्रा.सिद्धोधन मोरे,राहुल वडमारे,संतोष मोकळे,गुणरत्न सोनवणे, नरेश वरठे,ऍड.अतुल कांबळे,दीपक निकाळजे,प्राणतोष वाघमारे,बलराज दाभाडे,बाळू वाघमारे,मिलिंद बनसोडे,सिद्धार्थ सदाशिवे,नानासाहेब दांडगे,शैलेंद्र मिसाळ, अरविंद कांबळे,सोनू नरवडे,कपिल बनकर,शैलेंद्र म्हस्के,प्रकाश कोतकर,मिलिंद दाभाडे,इसा यासिन,जॉन भुईगळ,वसंतराज वक्ते,रमेश मगरे,विजय शिंदे,राहुल मकासरे,विनोद साबळे,रवी जावळे,भूषण हिवराळे,जवाहर भगूरे, संजय चिकसे,प्रभू कटारे,अविनाश डोंगरे,स्वप्नील गायकवाड, नितीन साळवे,अंकुश शिंदे,रवींद्र वाघ,बंटी सदाशिवे,बाबा तिवारी,अज्जू रगडे, किरण बचके,प्रथम कांबळे, सोमु भटकर,दिनेश नवगिरे,अक्षय दांडगे,नवल सूर्यवंशी,मनीष नरवडे,विजय जाधव,राहुल खंडागळे, धम्मा रगडे,पंकज अमराव,नागेश जावळे, सोनू पाईकडे,कैलास काळे,किरण तुपे,राहुल गवळी,सम्यक सर्पे,प्रमोद निकाळजे, विकास रोडे,मनोज भालेराव,दैवशीला झिने,जयश्री शिरके,मिलिंद जमधडे,हरिदास बोरडे,पंकज सुकाळे,सुधाकर चांदणे,बबन सोनवणे,सचिन शिंगाडे,सुबोध जगधने,शुभम बनकर,राम साळवे,,पृथ्वी गडवे,सनी ओव्हळ, अर्जुन गडवे,राजेश शेवाळे,अनामी मोरे,गणेश उगले,सुमित नावकर,सिद्धांत भालेराव,दादाराव खोतकर,दौलत गायकवाड,दीपक केदारे,रोहित शेजवळ, प्रमोद मगरे,प्रदीप पगारे,कुणाल कांबळे, सागर पोळ,दिनेश मोरे,मनोज नरवडे,सचिन गायकवाड, बबलू मोरे,आदींचा आंदोलनात सहभाग होता.



No comments:

Post a Comment

Pages