औरंगाबाद, दिनांक 17 : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि विद्यमान शासनाला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाच्या संयुक्त विद्यमाने आकाशवाणीवर विशेष मुलाखतींचे आयोजन करण्यात आलेले आहे. कौशल्य विकास व रोजगाराच्या संधी या विषयावर कौशल्य विकास रोजगार, व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संपत चाटे यांची मुलाखत 18 व 19 मार्च शुक्रवार व शनिवार रोजी आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून सकाळी 7.45 वाजता प्रसारीत होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे कौशल्य विकास रोजगार, व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संपत चाटे यांनी मुलाखतीमध्ये या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कौशल्य अभ्यासक्रम प्रशिक्षण, रोजगाराच्या विविध संधी विषयी सविस्तर माहिती दिली आहे. या मुलाखतीचा पहिला भाग 18 मार्च, शुक्रवार रोजी औरंगाबाद आकाशवाणीच्या 101.7 मेगाहर्टवरुन सकाळी 7.45 वा. प्रसारित होणार आहे. ही मुलाखत जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी घेतली आहे.
Thursday 17 March 2022
Home
मराठवाडा
जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या योजनाविषयी विशेष मुलाखतींचे प्रसारण संपत चाटे यांची आज आकाशवाणीवर मुलाखत
जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या योजनाविषयी विशेष मुलाखतींचे प्रसारण संपत चाटे यांची आज आकाशवाणीवर मुलाखत
Tags
# मराठवाडा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
मराठवाडा
Labels:
मराठवाडा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment