औरंगाबाद : येथील औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने एक दिवसीय माध्यम साक्षरता व फेक न्युज यावर गुगलच्या सहकार्याने फॅक्टशाला अंतर्गत ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते,याप्रसंगी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून या वेबिनारला गुगल फॅक्टशाळेचे प्रशिक्षक मध्य प्रदेश येथील आईटीएम विद्यापीठाचे जनसंवाद व पत्रकारिता विषयाचे डॉ. मनीष जैसल यांनी मार्गदर्शन केले. ऑनलाईन गुगल मिटच्या माध्यमातून डॉ.मनीष जैसल यांनी संवाद साधला.डॉ. जैसल यांनी सांगितले की, आजच्या आधुनिक काळात सत्यता ओळखणे आवश्यक आहे, डिजिटल पत्रकारिते मध्ये फेक न्यूज ओळखण्याची तांत्रिक दृष्टी भारतातील प्रत्येक नागरिकाला व्हावी,माध्यम साक्षरता, बनावट बातम्या व चुकीच्या माहितीचे प्रकाशन व प्रसारण ओळखता यावे, समजावे व जागरूक राहणे या उद्देशाने भारतभर अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन गुगलच्या फॅक्टशाळा उपक्रमांतर्गत राबविण्यात येत आहे,चुकीच्या माहीती विरोधातील लढा या संकल्पनेखाली ऑनलाईनद्वारे यांमधून लोकांमध्ये जागरूकता व सजगता निर्माण व्हावी,आपली होत असलेली फसवणूक माध्यम साक्षरतेमुळे टाळता येऊ शकते असेही यावेळी डॉ. जैसल यांनी सांगितले. या वेबिनारचे मुख्य आयोजक व काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष डॉ. अरूणभाऊ शिरसाट यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे समाजात सजग व जागरूक पिढी निर्माण करता येऊ शकते, वाढत्या प्रसार माध्यमांनी नागरिकांची कार्यपद्धती व जीवनशैली पूर्णपणे बदलून टाकली आहे, प्रसार माध्यमांच्या सकारात्मक व नकारात्मक आशयाकडे पाहण्यासाठी माध्यम साक्षरता असणे गरजेचे आहे, राजकारण्यांनी केवळ राजकारण न करता समाजकारण करावे व सक्षम समाज घडविण्यासाठी फेक न्युज सारखे प्रकार टाळून आजच्या माध्यमांनी लोकशाही संवर्धनासाठी आपली लेखणी सत्यतेकडे नेली पाहिजे असेही डॉ. शिरसाट यांनी सांगितले. कार्यशाळेचे समन्वयक डॉ. मिलिंद आठवले यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी सोशल मीडिया प्रमुख शिलवंत गोपणारायन यांनी तांत्रिक साहाय्य केले,प्रमोद धुळे यांनी आभार मानले, याप्रसंगी प्रा.प्रज्ञाकिरण जमधाडे,प्रा. डॉ. बाळासाहेब अंभोरे,राहुल वरशीळ,प्रतीक पारवे,राजेश नवघरे,सुदाम सोनोने,मनोज शेळके व निलेश वाघमारे उपस्थित होते, सामाजिक, राजकीय,माध्यम क्षेत्रातील अभ्यासक,विश्लेषक,संशोधक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Thursday 17 March 2022
Home
मराठवाडा
आजच्या काळात सत्यता ओळखणे महत्त्वाचे- डॉ. मनीष जैसल काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचा फेक न्यूजवर वेबिनार मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित
आजच्या काळात सत्यता ओळखणे महत्त्वाचे- डॉ. मनीष जैसल काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचा फेक न्यूजवर वेबिनार मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित
Tags
# मराठवाडा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
मराठवाडा
Labels:
मराठवाडा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment