जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे समाज कल्याण विभागाच्या योजनाविषयी विशेष मुलाखतींचे प्रसारण ; पांडुरंग वाबळे यांची आकाशवाणीवर मुलाखत - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 16 March 2022

जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे समाज कल्याण विभागाच्या योजनाविषयी विशेष मुलाखतींचे प्रसारण ; पांडुरंग वाबळे यांची आकाशवाणीवर मुलाखत

औरंगाबाद, दिनांक 16 : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि विद्यमान शासनाला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाच्या संयुक्त विद्यमाने आकाशवाणीवर विशेष मुलाखतींचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मुलाखतींचे प्रसारण 15 मार्चपासून आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून सकाळी 7.45 वाजता होत आहे.

औरंगाबाद जिल्ह्याचे  समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त पांडुरंग वाबळे यांनी मुलाखतीमध्ये  या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनाचा लाभ घेण्यासाठीची पात्रता,अर्ज करण्याची पद्धती,अनुसूचित जाती, व नवबौद्ध घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी असलेल्या योजनांची   अंमलबजावणी बाबत या मुलाखतीत  सविस्तर माहिती दिली आहे. या मुलाखतीचा पहिला भाग  17मार्च, गुरुवार रोजी औरंगाबाद आकाशवाणीच्या 101.7 मेगाहर्टझ्वरून सकाळी 7.45 वा. प्रसारित होणार आहे. ही मुलाखत माहिती अधिकारी मीरा ढास यांनी घेतली आहे.


No comments:

Post a Comment

Pages