महाविहार परिवारातर्फे व्याख्यानाचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 24 March 2022

महाविहार परिवारातर्फे व्याख्यानाचे आयोजन

नांदेड दि. 24 -

महाविहार परिवाराच्या वतीने शहरातील सहयोगनगर येथील रमाई बुद्ध विहारामध्ये शनिवार, दि. 26 मार्च रोजी दुपारी 3 वाजता आंबेडकरी चळवळीचे भवितव्य या विषयावर आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते सुरेश दादा गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच आंबेडकरी चळवळीसाठी आपल्या पूर्ण आयुष्यभर संघर्ष करून समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी चळवळीच्या माध्यमातून आयुष्य खर्ची घालणारे नेते, रिपाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य मा.मा. येवले यांच्या कार्याची माहिती युवकांना मिळेल, त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग चळवळीसाठी व्हावा आणि आपली जबाबदारी म्हणून महाविहार परिवाराच्या वतीने मा.मा. येवले यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कारही याच कार्यक्रमामध्ये करण्यात येणार आहे.

महाविहार परिवाराच्या वतीने प्रत्येक महिन्याला व्याख्यानाचे आयोजन करण्यात येत होते, परंतु कोरोना काळामध्ये हे व्याख्यान बंद झाले होते. समाजाचे प्रबोधन व्हावे, विविध सामाजिक विषयांवर समाजाला मार्गदर्शन करता यावे, प्रबोधनाच्या प्रक्रियेमध्ये खंड पडू नये, म्हणून महाविहार परिवाराच्या वतीने दर महिन्याला एका विषयावर समाजातील विचारवंताचे व्याख्यान आयोजित करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. त्यानुसार आंबेडकरी चळवळीची सद्यस्थिती काय आहे, चळवळ कृतिशील करण्यासाठी काय करावे लागेल यासह अनेक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ नेते सुरेश दादा गायकवाड यांचे आंबेडकरी चळवळीचे भवितव्य या विषयावर सविस्तर असे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी शहरातील आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविहार परिवारचे संयोजक यशवंत गच्चे, साहेबराव पुंडगे यांनी केली आहे.


No comments:

Post a Comment

Pages