वर्ग खोल्यांना बौद्ध लेण्यांची नावे ! सुंदर माझी शाळा उपक्रमातून विविध सामाजिक व शैक्षणिक संदेश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 5 March 2022

वर्ग खोल्यांना बौद्ध लेण्यांची नावे ! सुंदर माझी शाळा उपक्रमातून विविध सामाजिक व शैक्षणिक संदेश

औरंगाबाद  : डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती वतीने " सुंदर माझी शाळा " उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांविना ओसाड पडलेल्या शाळेच्या अबोल भिंती या उपक्रमामुळे जणू बोलक्या  झाल्या. कोरोनामूळे शाळा बंद असतांना नागसेन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी या वेळेचा सदुपयोग सुंदर माझी शाळा या उपक्रमासाठी केला.विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबर संस्कार आणि मुल्यशिक्षणाचे ज्ञान मिळावे या उद्देशाने भारतीय संविधानाची उद्देशिका,विविध सामाजिक संदेश ,मानवी उत्क्रांतीपासून ते अवकाश संशोधन,भौगोलिक आकृत्या,वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रदूषण आणि पाणी प्रश्न ,समाज माध्यमाचे फायदे आणि नुकसान,जगातील सात आश्चर्य,इतिहास,भूगोल इंग्रजी या सर्व विषयांच्या  विविध कलाकृतींद्वारे   कला शिक्षक नितीन पैठणे यांनी "बोलक्या भिंती" निर्माण केल्या आणि शाळा जणू  अलंकृत झाली. शाळेतील वर्गखोल्यांना महाराष्ट्रातील विविध बौद्ध लेण्यांची नावे देण्यात आली.प्रमुख पाहुण्यांना ही संकल्पना खूप आवडली.आरोग्य विषयक जनजागृती विद्यार्थ्यांमध्ये रूजावी या उद्देशाने क्रिडामैदानातील भिंतींवर विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळांचे प्रकार आणि विविध योगासनांच्या प्रतिकृती रेखाटन्यात आल्या.आपली सुंदर शाळा बघून खूप आनंदित झाले. कार्यक्रमाची सुरुवात बोधीसत्व डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पूतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.                                या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.अनिल साबळे विभागीय शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांच्या हस्ते करण्यात आले.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिव प्रा.डॉ.सिद्धांत गंगाधर गाडे तर विद्युत विभागातील मुख्य अभियंता मा.मिलिंद बनसोडे , संस्थाचालक प्राचार्य डॉ.सुनिल वाकेकर , संस्थाचालक प्राचार्य आवद चाऊस , नगर सेविका मा.लता निकाळजे , प्राचार्या भावना वंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या वतीने  मान्यवरांचे स्वागत डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित "भारतीय संविधान" हा ग्रंथ देऊन करण्यात आले.

      मान्यवरांच्या हस्ते कला शिक्षक नितीन पैठणे यांचे सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आले. तसेच सर्व शिक्षकांचे देखील सत्कार करण्यात आले. मान्यवरांनी यावेळी मोलाचे मार्गदर्शन करून  सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन भविष्यात विविध उपक्रम राबविण्याची प्रेरणा दिली.

      उर्दू कारवा संघटनेच्या वतीने आयोजित वकृत्त्व स्पर्धेत  इयत्ता बारावीची विद्यार्थिनी अनम फातेमा शकील कुरेशी हिने क्रमांक पटकाविले याबद्दल मान्यवरांच्या हस्ते तिचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्या भावना वंजारी , सुत्रसंचलन अंजू निकम तर आभार प्रदर्शित सुप्रिया परळकर यांनी मानले. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोवीड प्रादुर्भाव विषयक सर्व नियमांचे पालन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Pages