नागपुर:
अनुसूचित जाती अप योजनेअंतर्गत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेद्वारा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी करता यावी म्हणून अध्यापन वर्गाचे उद्घाटन आज दिनांक ४ मार्च २०२२ ला कृषी महाविद्यालय, नागपूर येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्य पाहुणे म्हणून आय. पी. एस. संदीप तामगाडगे उपस्थित होते. तर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एम. पंचभाई यांच्या अध्यक्षतेत हा सोहळा संपन्न झाला.
यावेळी तामगाडगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दरम्यान त्यांच्या जीवनात आलेल्या अनेक लहान-मोठ्या अडचणींच्या आठवणी त्यांनी उजाळा दिला. प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी संपादीत केलेले यश विद्यार्थ्यांपुढे मांडले. विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीत जगत असला तरी यश गाठण्यासाठी दृढ निश्चय असणे महत्वाचे आहे, अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
या कार्यक्रमाला अनुसूचित जाती अप योजनेचे समन्वयक डॉ. आर. एन. काटकर आणि सदस्य सचिव डॉ. सी. जे. गायकवाड उपस्थित होते.
No comments:
Post a Comment