भीमजयंती निमित्त नागसेन फेस्टिव्हलचे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी-माजी विद्यार्थ्यांतर्फे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 28 March 2022

भीमजयंती निमित्त नागसेन फेस्टिव्हलचे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी-माजी विद्यार्थ्यांतर्फे आयोजन


औरंगाबाद- नागसेनवनातील आजी-माजी विद्यार्थ्यांनी भीमजयंती निमित्त एकत्र येत नागसेन फेस्टिव्हलचे आयोजन १ ते ३ एप्रिल दरम्यान केले आहे. महोत्सवाचे यंदाचे  ७ वे वर्ष आहे. हा महोत्सव लुम्बिनी उद्यान, मिलिंद महाविद्यालय येथे दररोज सायंकाळी ६ ते १० वेळेत होणार असून महोत्सवानिम्मित आजी- माजी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती आयोजक सचिन निकम यांनी दिली.


3 दिवसीय महोत्सवात विविध वक्त्यांची व्याख्याने, एल्गार समतेचा अभिनव कवी संमेलन रंगणार आहे. याशिवाय मिलिंद मल्टिपर्पज हायस्कुलची डागडुजी आणि रंगरंगोटी साठी पुढाकार घेत विद्यार्थ्यांना विविध सुविधा पुरवणारे सेव्ह अवर प्राईड मिलिंद ग्रुप, 'रन फॉर इक्वालिटी' ही मॅरेथॉन आयोजित करणारी टीम,  विधी, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, कला, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवरांचा महोत्सवात सन्मान करण्यात येणार आहे. बाल तबला मास्टर प्रथमेश म्हस्के, पाली विषयात नेटमध्ये देशातून प्रथम आलेले सिवली अंगुलीमाल भन्ते यांचा विशेष सत्कार करण्यात येईल.

यांचे असणार आकर्षण

सिने क्षेत्रातील विविध कलावंत, झुंड सिनेमात रॅप गाणारे विपीन तातड व रॅप टोली या संचाचा रॅप सादरीकरण, कैलास खाणजोडे ह्यांच्या लाईव्ह पेंटिंग व शिल्प कलेचे प्रात्यक्षिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन, भीमगीतावरील नृत्य, तलवारबाजी व मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक आदी उपक्रम यंदाचे आकर्षक असणार आहे.

No comments:

Post a Comment

Pages