निर्भीड लढवय्ये पत्रकार : जयवर्धन भोसीकर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 27 March 2022

निर्भीड लढवय्ये पत्रकार : जयवर्धन भोसीकर

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारिता क्षेत्रातील नावजलेलं नाव आंबेडकरी बाण्याचे निर्भीड पत्रकार लढाऊ व्यक्तिमत्त्व म्हणजे जयवर्धन भोसीकर. आज त्यांचा वाढदिवस. यानिमित्ताने...


आंबेडकर हाच जगण्याचा श्वास मानून मार्गक्रमण करत पत्रकारितेच्या दुनियेत विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमात जयवर्धन भोसीकर यांनी एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांनी स्वा.रा. ती. म. विद्यापीठ नांदेड येथून इलेक्ट्रॉनिक माध्यमात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. 

विद्यार्थीदशेपासूनच अनेक उपक्रमांमध्ये त्यांनी हिरारीने सहभाग नोंदवला आहे. तो आजतागायत सुरू आहे.


जयवर्धन भोसीकर यांचा माध्यमांतील प्रवास अतिशय वाखाजण्याजोगा आहे. 'मी मराठी' या नामांकित न्यूज चॅनेलमध्ये त्यांनी काम केले आहे. वॉररुम सारख्या शो मधून अनेक दिगग्जांना त्यांनी बोलतं केलं आहे. जनसामान्यांचा आवाज बनून सत्ताधा-यांना धारेवर धरल्याचे जगाने पाहिले आहे. सद्या ते मँक्स महाराष्ट्र या वेब चॅनलमध्ये कार्यरत आहेत. मराठवाड्यातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अलीकडेच त्यांनी 'मराठवाडा डेली' हे युट्यूब चॅनल कार्यान्वीत केले आहे.


जयवर्धन भोसीकर यांची पत्रकारिता कधीच धनदांडग्याची बटीक राहिलेली नाही. त्यांच्या पत्रकारितेने नेहमी निपक्ष व निर्भीडपणे न्यायाची भूमिका घेतलेली आहे. जागल्या बनून जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याची आग्रही भूमिका त्यांची राहिलेली आहे. जयवर्धन भोसीकर यांनी आपल्या वाणीतून व लेखणीतून सामान्य जनांचा आवाज बुलंद केला आहे. अभ्यासूवृत्ती व संकटाशी दोन हात करण्याची धमक यामुळेच त्यांच्यातील आंबेडकरी बाणा कधीही कुणापुढे झुकला नाही.


जयवर्धन भोसीकर यांचा पिंड मुळातच चळवळीचा असल्यामुळे अनेक सामाजिक चळवळीमध्ये विशेषतः आंबेडकरी चळवळीत त्यांचा सहभाग राहिलेला आहे. आंबेडकरवादी मिशनच्या सार्वजनिक उपक्रमांमध्ये ते नेहमी अग्रणी असतात. समाजाचं काहीएक देणं लागतं या उदात्त भावनेतून त्यांची सदैव धडपड असते. त्यांच्या हातून अनेकानेक सत्कार्य घडो त्यांच्या वाणीला व लेखणीला हत्तीचं बळ मिळो हीच आजच्या प्रसंगी मंगल सदिच्छा!


- राहुल वाडे, नांदेड

No comments:

Post a Comment

Pages