छत्रपती शिवाजी महाराजांचा नविन पुतळा हा जुन्या जागेतच बसवण्यात यावा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 8 March 2022

छत्रपती शिवाजी महाराजांचा नविन पुतळा हा जुन्या जागेतच बसवण्यात यावा

किनवट (तालुका प्रतिनिधी) :

छत्रपती शिवाजी महाराजांचा नविन पुतळा हा जुन्या जागेतच बसवण्यात यावा जागेत बदल केल्यास आमरण उपोषणास बसण्यात येणार.या विषयाला अनुषंगिक निवेदन आज रोजी मुख्य कार्यकारी अधकारी याना सामाजिक व राजकीय संघटनाच्या पदाधिकाऱ्याने एकत्रित रित्या दिले.सदरील निवेदनात

वरिल विषयास अनुसरुण आपणास निवेदन देण्यात येते आहे की, किनवट शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा जुना पुतळा जिर्ण करुण नविन पुतळा बसविण्याची प्रक्रिया आपल्या नगर परिषद प्रशासना तर्फे सुरु असल्याची माहीती प्राप्त आहे.

तरी नगर परिषद प्रशासानाने छत्रपती शिवाजी महाराजांचा नविन पुतळा जुन्या जागेवर चौकातच बसविण्यात यावा. जर राजकिय दबावास घाबरुण ईतरत्र न.प. च्या प्रांगणात बसविण्याचा प्रयत्न झाल्यास आमचा त्या प्रक्रियेस विरोध होऊन न.प. प्रशासानाच्या विरोधात आमरण उपोषणास बसण्यात येईल त्या वेळेस सर्वस्वी जबाबदारी आपली राहील. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा लवकरात लवकर उभारावा अशी जनसामान्यांची ईच्छा आहे हे मात्र खरे..

सदर निवेदनावर जयवंत चव्हाण, अजय कदम पाटील, नगरसेवक अभय महाजन, उमाकांत कराळे, अशितोष बेंद्रे, सारंग पवार, निकेतन सूरोशे, शिवा पवार, राजू कदम, किशन मुंगल, अरविंद कदम, ओम काकडे सर्जेराव गुंजकर, आदी शिव प्रेमी प्रतिष्ठित मान्यवर च्या सह्या आहेत..

No comments:

Post a Comment

Pages