नांदेड, 3 मार्च -
भारतीय मंजूर संघ संलग्नीत बांधकाम कामगार महासंघाच्या नांदेड शहर सचिवपदी यशपाल अर्जून भोसले यांची निवड करण्यात आली आहे.
सन्मान पे्रस्टीज येथे आज दि. 3 मार्च रोजी बांधकाम कामगार महासंघाची बैठक घेण्यात आली. यावेळी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय सुरोशे, जिल्हाध्यक्ष सोपान भेटे, जिल्हा सरचिटणीस गजानन टोकलवार यांची उपस्थिती होती. या बैठकीत यशपाल भोसले यांची सर्वानुमते शहर सचिव पदी निवड करण्यात आली. बैठकीत उपस्थित पदाधिकार्यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या निवडीबद्दल यशपाल भोसले यांचे स्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment