मुंबई :
अफ्फान आझम सिद्धीकी हा शिक्षणासाठी युक्रेन देशातील एव्हाना या ठिकाणी द्वितीय वर्षातील एम.बी.बी.एस.शिक्षण घेत होता.आज आठव्या दिवशी तो भारतात दाखल झाला.
आज तो राहत असलेल्या खोली.१ मुख्तार निवास, टेक्निकल एरिया, मरोळ पाईपलाईन, अंधेरी-कुर्ला रोड, मुंबई या ठिकाणी वॉर्ड क्र.८२ (८४) च्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन अफ्फान आजम सिद्धीकी याचे कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.व पुष्पगुच्छ देऊन स्वागत देखील केले.
रशिया आणि युक्रेन देशात युद्ध सुरू झाल्यावर एव्हाना येथून जवळपास २००० लोकांसह तो रोमानिया देशात पोहचला जवळ पास अनेक किलोमीटर चालून आणि 30 तास उपाशी तापाशी रांग लावून विमानतळ गाठले. व विमानातुन तो भारतात आज परत आला. त्याचे त्याच्या घरी जाऊन स्वागत करताना रिपाइं मुंबई चिटणीस व रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघ सरचिटणीस रतन अस्वारे, वॉर्ड सरचिटणीस दिलीप महादेव कांबळे, रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघ वॉर्ड अध्यक्ष मिलिंद देवजी गमरे, सरचिटणीस सुदेश कडवे,रिपाई महिला आघाडी वॉर्ड अध्यक्षा शकुंतला कांबळे, रिपाइं विलेपार्ले तालुका आयटी प्रमुख गणेश ठोकळे, सूर्यकांत सोरटे (बबन) व सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे हे अफ्फान आझम सिद्धीकी यांचे स्वागत करताना छायाचित्रात दिसत आहेत.
No comments:
Post a Comment