नागपूर -
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष, ६२ वा महाराष्ट्र दिवस आणि जागतिक कामगार दिवसाच्या निमित्ताने संविधान फाऊंडेशनच्या वतीने १ मे २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वा. नागपूरातील संविधान चौकात संविधान वाचन केले जाणार आहे.
राष्ट्राची एकता आणि एकात्मतेसाठी बंधुभाव प्रवर्धित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सद्या देशात, जाती धर्मावरून माणसामाणसात द्वेष निर्माण करण्याच्या प्रयत्न होत आहे. तेव्हा, समानता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायाच्या तत्वानुसार माणसे जोडण्याचा संकल्प होणे गरजेचे आहे. प्रेम, मैत्री, करुणा या शाश्वत मूल्यांचा जागर होऊन बंधुभावाचा भारत निर्माणासाठी हे एक पाऊल आहे. या अनौपचारिक कार्यक्रमात नागरिकांनी विशेषतः तरुणांनी मोठ्या संख्येने उस्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन संविधान फाऊंडेशनचे संस्थापक व माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment