डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत एक वही एक पेन अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 15 April 2022

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत एक वही एक पेन अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद


परळी  ( प्रतिनिधी ) - महामानव, विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या शैक्षणिक जागृतीसाठी महत्वपूर्ण एक वही एक पेन या अभियानास काल डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
         सामाजिक कार्यकर्ते    विकास रोडे व पञकार विकास वाघमारे यांनी रेल्वे स्टेशन येथील परिसरात डाॅ. आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर या उपक्रमाचे  14  एप्रिल रोजी आयोजन केले होते. या उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भीमशाहीर अशोक निकाळजे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारोती मुंडे, यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी संभाजी नगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक चाटे, एपीआय  गित्ते, रुपेश शिंदे,शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे बाजीराव धर्माधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सौ. सुदामती गुट्टे , नगरसेवक, दिपक अष्टेकर ,माजी नगरसेवक रवि मुळे, जेष्ठ नेते वैजनाथ सोळंके, रवि परदेशी, जेष्ठ पञकार व साहित्यिक रानबा गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघमारे,गंगाधर अप्पा रोडे,  वंचित बहुजन आघाडीचे ता. अध्यक्ष संजय गवळी, अॅड. संजय रोडे,डाॅ. आकाश वाघमारे, रेल्वे अधिकारी वाले,  बालासाहेब जगतकर, नवनाथ दाने,मोहन साखरे,  वाले,पञकार कैलास डुमणे, अनिल मस्के, मिलिंद गायकवाड,  शिवाजीराव बनसोडे, वडमारे साहेब, चंद्रमणी वाघमारे, जीवन वाघमारे, पञकार आकाश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

         यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकर अनुयायांनी मोठ्या प्रमाणात वह्या आणि पेन दान दिल्या. नवीन शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू होताच गरजू व होतकरू विद्यार्थी, विद्यार्थिनींना याचे वाटप करण्यात येणार असल्याचे विकास वाघमारे यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

Pages