नवीन नांदेड - महात्मा गांधी अध्यापक महाविद्यालय सिडको येथे शैक्षणिक साधनांचे प्रदर्शन नुकतेच संपन्न झाले, या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध विषयावर शैक्षणिक साधने बनवून आणली होती. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी हायस्कूलचे एस.बी. मोरे सर होते तर उद्घाटक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य एस.व्ही.घुले सर यांची उपस्थिती होती.
अध्यापनामध्ये शैक्षणिक साधनांचा वापर करून अध्यापन प्रभावी पणे सादर करता येते, असे मत प्राचार्य घुले सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन प्रा.एस.बी.पत्रे मॅडम यांनी केले तर आभार अरुण सूर्यवंशी यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment