'नागसेन फेस्टिव्हल' सारखे संमेलन ही काळाची गरज - सुप्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद शिंदे ; नागसेन फेस्टिव्हल २०२२ चं जल्लोषात उद्घाटन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 2 April 2022

'नागसेन फेस्टिव्हल' सारखे संमेलन ही काळाची गरज - सुप्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद शिंदे ; नागसेन फेस्टिव्हल २०२२ चं जल्लोषात उद्घाटन

औरंगाबाद/प्रतिनिधी: 

कोविडच्या सावटानंतर तब्बल २ वर्षांनंतर आज पुन्हा औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणात 'नागसेन फेस्टिव्हल २०२२' चा मोठ्या जल्लोषात उद्घाटन समारंभ संपन्न झाला. मिलिंद महाविद्यालयाच्या नागसेनवनातील आज-माजी विद्यार्थी तसेच मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशन आणि नागसेन फेस्टिव्हल संयोजन समिती यांच्या वतीने या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले. यावेळी सुप्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद शिंदे हे प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच या फेस्टिव्हलमध्ये 'काला ते झुंड' चित्रपटसृष्टीचे बदलते परिणाम या विषयावर व्याख्यानही आयोजित करण्यात आले होते. या व्याखानासाठी सुनील गजाकोश हे व्याख्याते म्हणून उपस्थित होते तर नाट्य-चित्रपट लेखक राजकुमार तांगडे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. 

'नागसेन फेस्टिव्हल २०२२' चं काल सायंकाळी मोठ्या जल्लोषात उद्घाटन झाले. यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना सुप्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद शिंदे म्हणाले की, माझे वडील याच मिलिंद महाविद्यालयात शिकले, या महाविद्यालयाने माझ्या वडिलांना घडवले. यामुळेच त्यांनी माझे नाव मिलिंद ठेवले. आज त्याच ऐतिहासिक मिलिंद महाविद्यालयात मला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले याचा मला सार्थ अभिमान आहे. तसेच नागसेन फेस्टिव्हल सारखी संमेलने ही काळाची गरज आहे. अशाच संमेलनांमधून समाज घडत असतो. समाजाची वैचारिक जडणघडण होत असते 'मिलिंद' मुळेच आमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली असे प्रतिपादन केले.

यावेळी  इंजि.कुलदीप रामटेके,पी बी अंभोरे,प्रशांत संघवी,दौलतराव मोरे,मनीष धुत ह्याची प्रमुख उपस्थिती होती.

रॅपर विपीन तातड,सिने अभिनेते रुपेश परतवाघ ह्यांना मिलिंद शिंदे ह्यांचा हस्ते महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

तसेच सहा. पोलिस आयुक्त बालाजी सोनटके,आंबेडकरी करकर्ते,श्रावण गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक कल्याण चाबुकस्वार,जेष्ट आंबेडकरवादी कार्यकर्ते प्रकाश जाधव,छायाचित्रकार चेतन शिंदे,डॉ.हेमा थोरात,डॉ.अविनाश सोनवणे,नांदेड येथील श्रीधर वाघमारे,शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान,रन फॉर इक्वालिटी ची आयोजन समिती ह्यांना मिलिंद सन्मान देऊन गौरविण्यात आले.

एशियन बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक विजेती सृष्टी साठे,छत्रपती पुरस्कार विजेती स्नेहा ढेपे,न्यायाधीश प्रफुल्ल टेलगोडे (जे एम एफ सी उत्तीर्ण) ह्यांचे विशेष सत्कार करण्यात आले.

सूरज बनकर आणि संचाचे भीमगीतावरील नृत्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले,तर कैलास खाणजोडे ह्या चित्रकाराने लाईव्ह चित्रलकलेचे प्रात्यक्षिक दाखविले त्याचेही उपस्थितांनी कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन निकम,सिद्धार्थ मोकळे ह्यांनी प्रास्ताविक केले तर हेमंत मोरे ह्यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.किशोर वाघ, प्रा.प्रबोधन बनसोडे,विशाल सरपे,अविनाश कांबळे,ऍड.अतुल कांबळे, कुणाल भालेराव,शुभम पडघन,सागर ठाकूर,निखिल आराक, प्रवीण हिवराळे,सतीश शिंदे,अशोक मगरे,शैलेन्द्र म्हस्के,नीलेश वाघमारे,कुणाल झाल्टे,गुणरत्न सोनवणे,अमित दांडगे,आशिष कसबे,प्रेम ढगे,विशाल देहाडे,आनंद सूर्यवंशी,आदित्य इंगळे,महेंद्र मगरे,सिद्धांत भालेराव,मयांक खरे आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages