डॉ. बबन जोगदंड यांच्या पुढाकारातून दुबईमध्ये झाला महाराष्ट्रातल्या ३३ जणांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 2 April 2022

डॉ. बबन जोगदंड यांच्या पुढाकारातून दुबईमध्ये झाला महाराष्ट्रातल्या ३३ जणांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

पुणे,दि 3 एप्रिल २०२२ (  प्रतिनीधी)   सर्वाधिक पदव्या प्राप्त केलेले डॉ बबन जोगदंड यांच्या पुढाकाराने दुबईमध्ये सातासमुद्रापार राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, प्रशासकीय, व्यावसायिक, क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या ३३ जणांचा  दुबई येथे जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

गेल्या तीन वर्षापासून डॉ.बबन जोगदंड यांच्या पुढाकारातून राज्यभरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. 

यावर्षी संगीत क्षेत्रात योगदान देणारे औरंगाबाद येथील  नितीन सरकटे, पुणे येथील ऊस संशोधक डॉ. सुरेश पवार,सकाळ समूहातील संपादक संदीप काळे,नांदेड येथील अधिकारी  डॉ. विलास ढवळे,दापोली कृषी विद्यापीठातील विभाग प्रमुख डॉ. आनंद नरंगलकर, पुण्याच्या कृषी महाविद्यालयातील डॉ. गजानन लोळगे, सेवानिवृत्त वनाधिकारी मकरंद घोडके, सेवानिवृत्त उपकुलसचिव उत्तम ढोरे, नागपूरच्या भूजल सर्वेक्षण विभागातील अधिकारी तेजस्विनी वानखेडे, दिल्ली येथील  निखिल कुमार,राहुल भातकुले,व्यावसायिक वैभव रोकडे,  नांदेडचे जिल्हा परिषद सदस्य  दशरथ लोहबंदे, डॉ. किशोर पाटील समाजसेविका डॉ. मेघा राऊत ,मनीषा रोकडे,डॉ.प्रमोद राऊत,नांदेड येथील व्यवसायिक बाबुराव कसबे,संजय नरवाडे, साईनाथ चिद्रावार,मनोज धनपलवार, गोविंद सातपुते, इंजि.देविदास बोंडे, इंजि.बाळासाहेब भोसले, नागपूर येथील सरपंच विशाखा गायकवाड, नांदेड येथील समाजसेविका सुवर्णा खंदारे,संगीत क्षेत्रात काम करणारे संतोष बोराडे, प्रितेश चौधरी,नरेंद्र भोईर,प्रेमिला ढवळे यांचा समावेश होता.

 रत्नधाव फाउंडेशन , महालँड ग्रुप त्याचबरोबर दुबई येथील सफर संस्थेच्यावतीने दुबईमध्ये २९ मार्च रोजी दुबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा पुरस्कार समारंभ घेण्यात आला.

  या कार्यक्रमाला   ग्लोबल ॲम्बेसिडर लैला रहाल,मिस नाहेद,सफर ग्रुपचे संचालक अब्दुल अजिज अहमद, रेडियंट बिझ या बँकिंग क्षेत्रातील कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिजवान, पॅसिफिक स्पोर्टस लिमीटेड दुबईचे पार्टनर मोहम्मद मर्चंट, यशदा पुणे येथील अधिकारी डॉ.बबन जोगदंड,महालँड ग्रपचे प्रमुख एडवोकेट पंडित राठोड,रत्नधाव फाऊंडेशनचे प्रमुख चेतन बंडेवार, स्वप्ना कुलकर्णी, प्रिया बंडेवार व राहुल भातकुले यांची प्रमुख उपस्थिती होती.

 सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. मीडिया सिटी  येथील पंचतारांकित हॉटेल मीडिया रोटाना येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. 

यावेळी बोलताना ग्लोबल अँबेसिडर लैला राहाल म्हणाल्या की,अशा कार्यक्रमांमुळे दुबई आणि महाराष्ट्र व भारताचे संबंध अधिक दृढ होतील. डॉ. बबन जोगदंड यांनी विदेशामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांचा गौरव केल्यामुळे त्यांना समाजासाठी अधिक काम करण्याची ऊर्जा मिळते  म्हणून हा कार्यक्रम घडून  आणतो, असे सांगितले.

  हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून पुरस्कार विजेत्यांचे  अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

Pages