चंद्रपूर :
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातृसंघटना यांना बळकट करण्यासाठी आजपर्यंत ज्या कार्यकर्ते,नेते मंडळी यांनी आपल्या आयुष्यात सर्वस्व झोकून कार्य केले त्या सर्व मान्यवरांचे दखल घेणे काळाची गरज असून इंदूमतीताई पाटील यांनी रिपब्लिकन पक्ष बळकट करण्यासाठी चंद्रपूर शहर व जिल्हास्तरावर बॅरिस्टर राजसभाऊ खोब्रागडे व गिरीश खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली कार्य केले आहे आणि आम्ही चळवळीत कार्य करत असताना त्यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेत असतो असे मत इंदूमतीताई पाटील ७५वा वाढदिवसा निमित्ताने अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे पक्षाध्यक्ष प्रविण हेमचंद्र खोब्रागडे यांनी व्यक्त केले.याप्रसंगी प्रबुद्ध जेष्ट नागरिक संघाच्या वतीने द्रोबदाताई काटकर यांनी इंदुमतीताई कडून संघटन कौशल्य व सर्वाना एकत्र घेऊन चालण्याच्या प्रवृत्तीचे अनुकरण केले पाहिजे असे मत व्यक्त केले यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते विषलचंद्र अलोने,प्रतीक डोर्लीकर,राजुभाऊ खोब्रागडे, राजस खोब्रागडे,प्रेमदास बोरकर,निर्मला नगराळे,शतकोत्तर समितीचे गीता रामटेके,ज्योती शिवणकर,प्रबुद्ध जेष्ट नागरिक संघाचे प्रदीप अडकीने,वामनराव गौरकर,ब्ल्यू मिशन ट्रस्टचे प्रा.दुशांत नगराळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन विशाल चिवंडे प्रास्ताविक सचिन पाटील,व आभार मृणाल कांबळे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या आयोजना अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष शाखा पठानपुरा तर्फे करण्यात आले होते.
No comments:
Post a Comment