किशोरवयीन मुलींनी खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष द्यावे:-डाॅ.नैना देशमुख - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 1 April 2022

किशोरवयीन मुलींनी खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष द्यावे:-डाॅ.नैना देशमुख

भोकर (प्रतिनिधी)बाल विकास  प्रकल्प नागरी क्र 3नांदेड अंतर्गत 21मार्च ते 4एप्रिल दरम्यान पोषण पंधरवाडा अभियान अंतर्गत अॅनिमिया आजारा विषयी जनजागृती करण्यासाठी भोकर येथील जेठीबानगर,समतानगर, आणि मुधोळगल्ली च्या  अंगणवाडी सेविका यांनी पाककृतीचे प्रदर्शन तसेच पोषण गुढीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ .नैना देशमुख .यांनी उपस्थित राहुन  महीलांना तसेच किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन केले.  नागरी प्रकल्प ०३ C.d.p.oमिंलीद वाघमारे ,मुख्य सेविका श्रीमती शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

ॲनिमिया म्हणजे काय ? 

अॅनिमिया  म्हणजे रक्तक्षय ,शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होणे ,रक्ताचे प्रमाण म्हणजे रक्तामध्ये जे हिमोग्लोबिन किंवा लोह तत्व असते  त्याचे प्रमाण कमी होणे ,आज-काल जास्तीत जास्त लोकांना ॲनिमिया होत आहे, त्याचे कारण म्हणजे पोषक आहार न घेणे. 

सर्वप्रथम ॲनिमियाचे काय लक्षण असतात ते आपण बघू .चक्कर येणे  , डोळ्यापुढे अंधारी येणे ,खूप थकल्यासारखे वाटणे ,काहीच करायची इच्छा न होणे .हाता पायावर सूज येणे. तोंडावर सूज येणे . अशी लक्षणे दिसायला लागतात तेव्हा लगेच जाऊन रक्ताची तपासणी करणे आवश्यक असते .ॲनिमीया साठी आवश्यक असणारा पोषक आहार विटामिन्स, प्रोटिन्स कार्बोहायड्रेट्स या सर्वांनी युक्त असा आहार .म्हणजेच हिरव्या पालेभाज्या, सर्व प्रकारची फळे, लिंबू ,मोसंबी, सफरचंद ,डाळिंब मोड आलेली कडधान्य. रोजचे एक टमाटे, गाजर ,बीट काळ्यामनुका, अंजीर ,रोज एक अंडे असा  सकस आहार घ्यावा .म्हणजे रक्ताची कमी होत नाही ,पाणी भरपूर प्यावे. लोखंडाच्या कढईचा जास्तीत जास्त वापर करणे म्हणजे त्यातून लोह जाते. माठातलं पाणी वापरणे . 

 किशोरवयीन मुलींनी म्हणजे आता त्यांची वाढ होते आहे. त्या वयात येत आहे ,त्यांनी आपल्या खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष द्यावे. गरोदर बायका म्हणजे त्यांच्यासोबत एक जीव अजून जगत असतो त्यामुळे त्यांना दोघांचे जेवण करणे आवश्यक आहे, म्हणजेच भरपूर पोटभरून जेवण करावे, व्यायाम सुद्धा करावा. स्वतःकडे लक्ष द्यावे असे डाॅ. नैना देशमुख यांनी सांगितले. 

उन्हाळ्यात भाजीपाला. अन्न पदार्थ ठेवण्यासाठी आणि पिण्याच्यापाण्या करिता घरात मातीच्या माठाचा वापर करावे असे   प्रकाश कोंडलवार यांनी सांगितले.  कार्यक्रमास येतांना महीलांनी प्रदर्शनासाठी  विविध प्रकारचे अन्नपदार्थाचे पाककृती  बनवून आणल्या होत्या.यावेळी भोकर येथील  स्ञीरोग तज्ञ डाॅ.नैना देशमुख, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य. प्रकाश पाटील कोंडलवार,केंद्र प्रमुख जकीयोदीन, मुख्याध्यापक वटटमवार, प्रञकार लक्ष्मण पाटील बाभळीकर,  सफीयोदीन, मो.सजीयोदीन, सफीपटेल, आदी उपस्थित होते. अंगणवाडी सेविका सौ.शकुंतला शिंदे, मुनेश्वर शकुंतला, अर्चना नरवाडे, या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, मदतनीस दुर्गाबाईं जोशी, गोदावरी मोरे, लयाखबी,यांनी सहकार्य केले. सुञसंचलन सौ.शकुंतला मुनेश्वर यांनी केले तर  सौ.शकुंतला शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


No comments:

Post a Comment

Pages