भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अजित गायकवाड, कार्याध्यक्षपदी प्रा. अंजना गायकवाड तर जनरल सेक्रेटरीपदी शिवम सोनकांबळे ; भारतरत्न डॉ.आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीची अभूतपूर्व बैठक - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 31 March 2022

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अजित गायकवाड, कार्याध्यक्षपदी प्रा. अंजना गायकवाड तर जनरल सेक्रेटरीपदी शिवम सोनकांबळे ; भारतरत्न डॉ.आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीची अभूतपूर्व बैठक

सोलापूर :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अजित गायकवाड तर कार्याध्यक्षपदी प्रा. अंजना गायकवाड यांची निवड करण्यात आली. तसेच जनरल सेक्रेटरी पदी शिवम सोनकांबळे, खजिनदारपदी  शरणू  हजारे तर ऑडिटरपदी मदन वडावराव यांची निवड करण्यात आली आहे.

     डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल फॉरेस्ट येथे 31 मार्च 2022 रोजी सायंकाळी आयोजित

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव व  विश्वस्त समितीच्या अभूतपूर्व भव्य नियोजन बैठकीत उत्सव समितीच्या पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली.

    यावेळी विश्वस्त व उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपली सडेतोड भूमिका मांडली. नव्या महामंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. घणाघाती टीका करत आरोपांच्या फैरी झाडल्या.

     भारतरत्न डॉ.आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव व विश्वस्त समितीच्या अभूतपूर्व बैठकीत पदाधिकाऱ्यांनी यंदा भीमजयंती मिरवणूकीत कंटेनर नको. पारंपरिक मार्गावर दिमाखदार सर्व सुविधायुक्त मिरवणूक काढावी अशा सूचना केल्या. तर नव्या महामंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेत घणाघाती टीका केली.

     यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे विश्वस्त राजाभाऊ सरवदे,  राजाभाऊ इंगळे,  राहुल सरवदे , सुभानजी बनसोडे , सुबोध वाघमोडे, एडवोकेट  संजीव सदाफुले, कामगार नेते अशोक जानराव , माजी नगरसेवक रवि गायकवाड,  प्रवीण निकाळजे  , अरुण भालेराव,

बबलू गायकवाड , राजा कदम,  शशि कांबळे,  अतुल नागटिळक,  राजरत्न फडतरे,  एडवोकेट बडेखान, युवराज पवार , अजित गायकवाड , राजा  सोनकांबळे यांच्यासह विश्वस्त व उत्सव समितीचे पदाधिकारी , सदस्य, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages