1 ते 12 एप्रिल दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत भिमोत्सव चे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 31 March 2022

1 ते 12 एप्रिल दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत भिमोत्सव चे आयोजन


औरंगाबाद :  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्य बाबाबसाहेबांच्या वैचारिक आणि सांस्कृतिक विचारांचा जागर करण्याकरिता  भिमोत्सव समतेचे युवा पर्व चे आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकरमराठवाडा विद्यापीठ नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. 

महोत्सववाला माजी कुलगुरू अरुण सावंत , अंजलीताई आंबेडकर , अभिनेते प्रवीण डाळींबकर, आबा उन्हवणे, बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये यांची उपस्थिती लाभणार आहे.

       मागील 9 वर्षांपासून भिमोत्सव चे यशस्वीरित्या आयोजन करण्यात येत असून यंदाचे हे 10 वे वर्ष आहे. उद्घाटन दि. 1 एप्रिल रोजी सायं.6:30 वा. ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार असुन अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.प्रमोद येवले हे राहणार आहेत.

       प्रमुख पाहुणे आ.सतीश  चव्हाण , बाबुराव पोटभरे, डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.संजय सांभाळकर , अमित भुईगळ यांची उपस्थिती राहणार आहे.  

  या महोत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार  देऊन गौरविण्यात येणार आहे.  


       2 एप्रिल रोजी डॉ.हमराज उईके यांचे आंबेडकरी क्रांतीपुढील आव्हाने या  विषयावर व्याख्यान होणार आहे. 3 आणि 4 एप्रिल रोजी युनिव्हर्सिटी आयडॉल ची अनुक्रमे प्रथम व द्वितीय फेरी पार पडणार आहे.तर 5 रोजी अंतिम फेरी होईल.यानंतर भाग्यश्री इंगळे यांचा भिम गीतांचा कार्यक्रम होईल.

    6 ,7 एप्रिल रोजी नाट्यमहोत्सव 8 एप्रिल रोजी भिमशाहीर मेघानंद जाधव यांचा परिवर्तनाचा वादळवारा हा प्रबोधनात्मक आंबेडकरी जलसा होईल.9 रोजी नितेश कऱ्हाळे हे स्पर्धा परीक्षा परीक्षेवर मार्गदर्शन करतील.10 रोजी आंबेडकरी कवी संम्मेलन ,11 रोजी आकाशराजा गोसावी यांचा भीमगीतांचा कार्यक्रम ,12 रोजी संतोष मोरे यांच्या प्रवाह गीतांचा हा कार्यक्रम संपन्न होईल.  

         या बरोबरच विविध स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य निमंत्रक प्रा.प्रकाश इंगळे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages