औरंगाबादमध्ये जय भीम चा गजर; अभिवादना साठी उसळला भीमसागर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 14 April 2022

औरंगाबादमध्ये जय भीम चा गजर; अभिवादना साठी उसळला भीमसागर

 

     औरंगाबाद :      दोन वर्षांच्या खंडानंतर  भिमजयंती हर्षोल्हासात साजरी करण्यात आली.डॉ.बाबासाहेबां आंबेडकर यांची जयंती यंदा शहरात जल्लोषात साजरी करण्यात आली.

13 एप्रिल च्या मध्यरात्री 12 वाजताच्या ठेक्याला आतिषबाजी करून पासूनचजल्लोषाला सुरुवात झाली.


सायंकाळी 7 वाजतापासून शहरातील वस्त्यांमधून मिरवणुका क्रांतिचौका कडे मार्गस्थ झाल्या.पांढरी वस्त्रे परिधान केलेले लाखो अनुयायांच्या गर्दीने क्रांती चौक ते सिटी हा चौक मार्ग भरून गेला होता.

हाती निळे व पंचशील ध्वज डोक्यावर बांधलेल्या निळ्या फेट्यांनी सर्वत्र निळाई पसरल्याचे दिसत होते.

डीजेवरिल भीमगीतांवर तरुणाई थिरकत होती.


शहरातील अनेक रस्त्यांवर मिरवणुका 


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेले शेकडो भीमरथ या मिरवणुकीत जागोजागी सहभागी होत होते.मुख्य मिरवणूक मार्ग क्रांती चौक ते भडकलगेट असा होता. या मार्गावर आकाशवाणी ,पिरबाजार ,रेल्वेस्टेशन कडून अनेक भीमरथ येत होते.

खोकडपुऱ्यातुन अनेक भीमरथ मिरवणुकीत सहभागी झाले.पुढे भीमनगर ,भावसिंगपूरा ,घाटी कडून येणारे भीमरथ औरंगापुरा मार्गे येऊन गुलमंडी येथे सहभागी होत होते,तर शाहबाजारच्या दिशेने येणारे भीमरथ शाहगंज मार्गे सिटीचौकात मिरवणुकीत सहभागी झाले.


मिरवणूक मार्गावर दुतर्फा आंबेडकरवादी जयंती उत्सव समिती, रिपब्लिकन सेना, भीमशक्ती,पँथर्स रिपब्लिकन पार्टी, वंचित बहुजन आघाडी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)व इतर संघटनांनी भव्य व आकर्षक स्वागतमंच उभारले होते.


सिटी चौक मार्गे मिरवणुका भडकलगेट पर्यंत पोहचल्यानंतर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीची सांगता झाली.


No comments:

Post a Comment

Pages