राजधानीत महात्मा फुले जयंती साजरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 11 April 2022

राजधानीत महात्मा फुले जयंती साजरी


नवी दिल्ली, दि. 11 : थोर समाज सुधारक व क्रांतिकारक विचारवंत महात्मा जोतीबा फुले  यांची  जयंती आज उभय महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. 

             कोपर्निकस मार्गस्थित  महाराष्ट्र सदनातील सभागृहात तसेच कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या  पुर्णाकृती पुतळयाजवळ आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त तथा  निवासी आयुक्त (अ.का.) डॉ राजेश अडपावार यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र  सदनाच्या व्यवस्थापिका भागवंती मेश्राम यांच्यासह उपस्थित अधिकारी  व  कर्मचाऱ्यांनी  महात्मा फुले  यांच्या  प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 


         महाराष्ट्र परिचय केंद्रात महात्मा फुले यांना अभिवादन

             महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात  महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी  तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह   कार्यालयात उपस्थित  कर्मचाऱ्यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

                                           

No comments:

Post a Comment

Pages