स्पर्धा परिक्षेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 10 April 2022

स्पर्धा परिक्षेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...!

देगलूर, जय भोसीकर:

प्रा. उत्तमकुमार कांबळे मित्र परिवारातर्फे महात्मा ज्योतिबा फुले व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्तिक जयंतीनिमित्त देगलूर महाविद्यालय देगलूर येथे खुली स्पर्धा परिक्षा घेण्यात आली. या स्पर्धेत 213 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थी MPSC/ UPSC सारख्या स्पर्धा परीक्षेकडे वळाले पाहिजेत व अधिकारी घडले पाहिजेत असा मानस प्रा. उत्तमकुमार कांबळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतेवेळी व्यक्त केला . ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी प्रा. डाॅ. शेरीकर, प्रा. डाॅ. सुदाम, प्रा. डाॅ. कंधारे, प्रा.लझडे सर,   . डाॅ. चोले सर,  प्रा. बाकेवाड सर, प्रा. रणखांब सर, प्रा. भालेकर सर, प्रा. भुरे सर, दोंतुलवाड सर, मिरलवार सर,   मंगरूळे सर, प्रा. डाॅ. गायकवाड, किशनराव पांचाळ सर,   प्रा. डाॅ. गुजे, प्रा. संग्राम पाटील सर, प्रा. दत्ता पाटील सर व इतर यांनी सहकार्य केले. परिवाराचे विकास नरबागे , अनिल हसनाळकर, शैलेश भुताळे, विकास देगलुरकर, किरण कांबळे, बालाजी कांबळे, रामेश्वर कंधारे, , संतोष पद्दमवार व इतर सदस्यांनी पारदर्शी परीक्षा घेण्यासाठी खूप मेहनत घेतली. प्रा. डाॅ. माधव चोले सर, प्रा. सर्जेराव रणखांब सर यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले तसेच विकास नरबागे व सचिन सांगवीकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. देगलूर महाविद्यालय देगलूर चे अध्यक्ष मा. प्रकाश पाटील बेंबरेकर,  प्राचार्य डाॅ. मोहन खताळ सर, उपप्राचार्य गोविंदवार सर  तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणारे सर्व प्राध्यापक वृंद, परीक्षेस आलेले विद्यार्थी, परीक्षेची विनामूल्य प्रसिद्धी देणारे  कपिल उल्लेवार (संपादक), पत्रकार जयवर्धन भोसीकर, ॲड. अरुणकुमार सुर्यवंशी, पत्रकार अजिम अन्सारी, पत्रकार जावेद अहमद, पत्रकार मिलिंद वाघमारे, पत्रकार प्रा. भिमराव दिपके

व मित्र परिवारातील सदस्य या सर्वांचे  विशाल बोरगावकर यांनी आभार  मानले.

No comments:

Post a Comment

Pages