कॅनरा रोबॅको संस्थेच्या वतीने नंदकुमार घोडले हस्ते 50 विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 19 April 2022

कॅनरा रोबॅको संस्थेच्या वतीने नंदकुमार घोडले हस्ते 50 विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

औरंगाबाद :-  न्यू हायस्कूल, चौका कॅनरा रोबॅको संस्थेच्या वतीने माझ्या हस्ते 50 विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.

या शाळेत लिंगदरी, चिंचोली, सारोळा, सांजूळ, बिल्डा, मुर्शिदाबाद वाडी, चौकावाडी, मठपाटी अशा आसपासच्या खेड्याहून विद्यार्थी शिकण्यासाठी येतात.

यातील बर्‍याच विदयार्थ्यांना येण्या जाण्यासाठी वाहतुकीची सोय नव्हती. 

बहुतांश विद्यार्थी खासगी वाहनाने, बस ने किंवा स्वतःच्या सायकलने शाळेत येतात. वाहतुकीची सोय नसलेल्या काही वाडी - वस्ती वर राहणारे विद्यार्थी साधारणपणे 6 ते 10 किमी ची पायपीट करून  शाळा गाठायचे. 

विद्यार्थ्यांची ही समस्या शाळेतील शिक्षक अमोल भांडवलकर यांनी आपले मित्र कॅनरा रोबॅको संस्थेचे परेश भारंबे यांच्यापुढे मांडली.. माजी महापौर नंदकुमार घोडेले यांना परेश भारंबे यांनी या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आमंत्रित केले. त्यांनी या ग्रामीण भागातील शैक्षणिक व समाजोपयोगी उपक्रमास येण्याचे सहर्ष मान्य केले.

शालेय समिती अध्यक्ष शेख शमीम शेख अहमद यांनी मार्गदर्शन केले. सायकलीचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे हे 50 विद्यार्थी हरखून गेले.  या प्रसंगी धनंजय दंडवते यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना विविध 50  ग्रंथांचे वाटप केले.

या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माजी महापौर नंदकुमार घोडेले, विशेष निमंत्रित म्हणून कॅनरा रोबॅको चे  परेश भारंबे, प्रमुख पाहुणे म्हणून  धनंजय दंडवते, निलेश पाटील, शिवाजीराव वाघ, गजानन वाघलव्हाळे, गणी मौलाना, राहुल वाघ, मुख्याध्यापक ए. एस. माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमासाठी अथक परिश्रम करणाऱ्या सात्विक भारंबे याचे त्यांनी विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल भांडवलकर यांनी केले तर डी. के. काळे यांनी आभार मानले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस. एल. गुळवे , एस. डी. क्षीरसागर, डी.ए.खरात,  बी. के.बावस्कर , बाळासाहेब वाघमोडे, आर. के. पंडित, श्याम वाघमोडे, आर. एस. डव्हारे, श्री एम. टी.काळे, एस. बी. साळवे, आर. जे. झुंजूर, एस.पी. पिंपळे, आर. पी. टोलमारे , एस. एन. चव्हाण, व्ही.एस. नावकर, समाधान हिरे, विशाल पायगव्हाण, एम. के. डंबाळे एस. पी. सिरसाट यांनी विशेष प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment

Pages