मानवी जीवनात विज्ञानातील कार्यकारणभाव समजून घेणे ही काळाची गरज - सम्राट हाटकर ; देगाव( बु.) येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जंयती उत्साहात साजरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 21 April 2022

मानवी जीवनात विज्ञानातील कार्यकारणभाव समजून घेणे ही काळाची गरज - सम्राट हाटकर ; देगाव( बु.) येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जंयती उत्साहात साजरी

अर्धापूर, ता.19 ( बातमीदार), नवयुवक भीमजयंती मंडळ आयोजीत देगाव ( बु.) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.चेहरमन गणपतराव पा.तिडके ( भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना देगाव- येळेगाव) होते. प्रारंभी मा.गणपतरा पा.तिडके यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी प्रा.डाॅ. नरसिंग पिंपरणे यांनी इंग्रजी विषयात विद्यावाचसपती ( Ph.D) पद/पदवी प्राप्त केली.  व मा.सुरज तिडके यांची (  P.S.I.)पदावर नियुक्ती झाली म्हणून यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी मा.प्रा.नादरे सर,मा.सम्राट हाटकर( अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकारणी सदस्य), मा.सदाशिव गच्चे( लाॅर्ड बुद्धा चॅनल जिल्हा प्रतिनिधी), मा.पिंटु पा.जाधव,ग्रामपंचायत सदस्य: श्री. संभाजी जाधव, किरण तिडके, सौ.अर्चना साहेबराव पुंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी मा.सम्राट हाटकर म्हणाले की, मानवी जीवनात विज्ञानातील  कार्यकारणभाव समजून घेणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन केले. मा.हाटकर पुढे म्हणाले की, मंञाने जेवनातले पापड सुध्दा मोडता येत नाहीत. यावेळी यांनी विज्ञानावर आधारीत विविध प्रयोग सादर केले. या प्रेरणादायी सादरीकरणाला सर्व उपस्थितांनी परिणामकारक प्रतिसाद दिला.

  ज्येष्ठ संभाजीराव नवघडे, हिरामन नवघडे, एकनाथ पुंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.सी.नवघडे (  अध्यक्ष:नवयुवक भीमजयंती मंडळ ), सिध्दार्थ नवघडे (सचिव:नवयुवक भीमजयंती मंडळ ), राहुल नवघडे, उत्तम पुंडगे, नितिन नवघडे, अनिल नवघडे, सुनिल नवघडे, दत्ता नवघडे, काकनाजी सातोरे, कमलाकर कोकरे, सुधाकर नवघडे, रामेश्र्वर नवघडे, महेश हिंगोले, अनिल हिंगोले, रवी नवघडे, महेश हिंगोले, सुरज नवघडे, मनोज हिंगोले, महेंद्र थोरात, विनोद पुंडगे, संदेश कोकरे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. रंगनाथ नवघडे यांनी केले. प्रास्ताविक मा.राजेश्वरराव हिंगोले यांनी केले तर आभार साहेबराव पुंडगे यांनी मानले.


No comments:

Post a Comment

Pages