विद्यार्थ्यांना बाल पणापासूनच विशिष्ट जातीधर्माच्या नागरिकांविरोधात तयार केले जातय- सरफराज अहेमद ; तीन दिवसीय नागसेन फेस्टिव्हलचा जल्लोषात समारोप,मिलिंद सन्मानाने अनेकांचा गौरव - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 5 April 2022

विद्यार्थ्यांना बाल पणापासूनच विशिष्ट जातीधर्माच्या नागरिकांविरोधात तयार केले जातय- सरफराज अहेमद ; तीन दिवसीय नागसेन फेस्टिव्हलचा जल्लोषात समारोप,मिलिंद सन्मानाने अनेकांचा गौरव

औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील सर्वांना समता बहाल केली. पण इतिहासाचे विकृतीकरण करून खोट्या कथांचा व धर्माचा बडेजाव करून विद्यार्थ्यांना बाल पणापासूनच विशिष्ट जातीधर्माच्या नागरिकांच्या विरोधात तयार केले जात आहे.विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी अभ्यासक्रमातून कसे विकृतीकरण केले जाते ह्याची संदर्भासहित मांडणी सरफराज अहेमद यांनी केली.नागसेन वनात तीन दिवसीय नागसेन फेस्टिव्हलचा रविवार दि.३ रोजी शेवटचा दिवस होता.नागसेन फेस्टिव्हल मध्ये इतिहासाचे विकृतीकरण आणि धर्मांधतेचे राजकारण या विषयावर  सरफराज अहेमद  बोलत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले की, समतेला वाचविण्यासाठी प्राण देण्याचीही तयारी असावी,आपल्याकडे इतिहास खलनायक आणि अभिनेता या दोन भूमिकेतून सांगण्यात येतो.

  हेडगेवार आणि गोळवलकर हे कधीच इतिहासाचा भाग होऊ शकत नाही, टिपू सुलतान ह्यांच्या बाबतच्या खोट्या अफवांवर पुराव्यानिशी तोफ डागली.

ह्यावेळी मंचावर तृतीयपंथी कवयित्री दिशा पिंकी शेख,माहिती कार्यालय लातूरचे यशवंत भंडारे,डॉ.वाल्मिक सरवदे,प्राचार्य प्रमोद हेरोडे,उद्योजक मिलिंद शिंगारे ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ.उत्तम अंभोरे म्हणाले की,मिलिंद सारख्या शैक्षणिक संस्थेसारखे सर्वसमावेशक कार्य अन्य कुठल्याही संस्थेने केले नाही ही संस्था आता प्रत्येक जिल्ह्यात गेली पाहिजे संस्थेचा गुणवत्तेतला लौकिक पुन्हा वाढविण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे पीपल्स च्या भरभराटीसाठी कंबर कसली पाहिजे.सत्राच्या सुरुवातीस सिद्धार्थ मोकळे यांनी महोत्सवाची भूमिका विशद केली.मुख्य निमंत्रक सचिन निकम ह्यांनी कार्यक्रमाचे संचलन केले.जेष्ठ साहित्यिक ज.वि.पवार यांना देण्यात येणारा  मिलिंद गौरव पुरस्कार डॉ.उत्तम अंभोरे यांनी स्वीकारला.कोरोना ची स्थिती मांडणारा 'घेणं लॉकडाऊन' ह्या रॅप मधील शब्दांनी दडपशाहीविरुद्ध आवाज उठविण्याच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला.प्रांजल सुरडकर हिने भीमगीतांवरील नृत्य सादर केले.बाल तबलामास्टर प्रथमेश म्हस्के याचे तबलावादनाने महोत्सवाची सांगता झाली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.किशोर वाघ,?ड. हेमंत मोरे, प्रा.प्रबोधन बनसोडे,विशाल सरपे,अविनाश कांबळे,?अतुल कांबळे, कुणाल भालेराव,चिरंजीव मनवर,शुभम पडघन,सागर ठाकूर,निखिल आराक, प्रवीण हिवराळे,सतीश शिंदे,अशोक मगरे,शैलेन्द्र म्हस्के,नीलेश वाघमारे,कुणाल झाल्टे,गुणरत्न सोनवणे,सागर प्रधान,अमित दांडगे,आशिष कसबे,प्रेम ढगे,विशाल देहाडे,आनंद सूर्यवंशी,आदित्य इंगळे,महेंद्र मगरे,सिद्धांत भालेराव,आकाश जाधव,प्रसेनजीत गायकवाड, नितीन निकम,किरण शेजवळ,अमित कांबळे,दया चौरे, सुरेश मिसाळ, किशोर पाटील,विशाल भिसे,संजू पोळ,महेंद्र मगरे आदींनी परिश्रम घेतले.

  

उत्कृष्ट कार्याचा सत्कार 

विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल भिमोत्सवा चे आयोजक प्रा.प्रकाश इंगळे,नाशिक येथील उद्योजक,महेंद्र शिनगारे ,चित्रपट अभिनेते अभिमान उन्हवणे,बाल तबला मास्टर प्रथमेश म्हस्के ,बाल कलाकार प्रांजल सुरडकर ,दामिनी पथकाच्या आशाताई गायकवाड ,डॉ. रेखा मेश्राम, निवृत पोस्ट अधिकारीसुशीला खडसे,प्रा.निर्मला मगर-भिंगारे,डॉ. रोहिणी साळवे, अमोल भालेराव, उद्योजक निलेश नरवडे,सामाजिक कार्यकर्ते सुनील नायर, वसंत निकम,प्रशिक्षक भरत रेड्डी,डॉ.पुष्पा गायकवाड, इको निड्स चे प्रियानंद आगळे आदीना मिलिंद सन्मान प्रदान करण्यात आला.त्याचप्रमाणे सेव अवर प्राईड मिलिंद या समूहातील सदस्यांना मिलिंद सन्मान देऊन गौरव करण्यात आला.

रॅप टोली ने जिंकली लोकांची मने 

महोत्सवात विशेष आकर्षण असलेले झुंड फेम विपीन तातड,गौरव इंगोले,मंगेश इंगोले यांच्या रॅपटोली ने 'चल सुननाबे' , घेणं  लॉकडाऊन , हॅप्पी वुमन्स डे, लोकशाही या रॅप चे धमाकेदार सादरीकरण करत उपस्थितांना खिळवून ठेवले.रॅप च्या माध्यमातून महागाई,बेरोजगारी,जातीयता,महिलांवरील अन्याय अत्याचार,आई-वाहिनीवरून शिवीगाळ करणारे व महिला दिन साजरे करणार्‍याचा खोटेपणचा बुरखा त्यांनी फाडला.

विपीन च्या रॅप मधून


चालते सारा जाती वाद

वाटते तुले मजाक हाय

लय खतरनाक बाबू लय खतरनाक हाय

चालते वरतून गेम

मग खालतुन नेम

मग दंगे मग पंगे

मग होते फसवे धंदे

मग अलती भलती केस मध्ये

पोट्टे फालतू फसते

रायल शिक्षण पाणी मग कोर्टात घासते

चल लोकशाही नाही याले हुकूमशाही म्हणते...

देशातील आणीबाणीच्या स्थितीचे वास्तव मांडले

No comments:

Post a Comment

Pages