वंचित’चा ’फुले-आंबेडकर जयंती महोत्सव’ ’भीम पहाट’ व ’महा बुद्धवंदना’ कार्यक्रमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 14 April 2022

वंचित’चा ’फुले-आंबेडकर जयंती महोत्सव’ ’भीम पहाट’ व ’महा बुद्धवंदना’ कार्यक्रमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली

नांदेड :

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आज सकाळी भव्य महा बुद्ध वंदनेने चार दिवस चाललेल्या जयंती महोत्सवाची सांगता झाली. नांदेड शहरात महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे आयोजन करून जयंती महोत्सवाचा नवा आदर्श संयोजक इंजि. प्रशांत इंगोले यांनी घालून दिला

 वंचित बहुजन आघाडीच दिनांक 11 एप्रिल ते 14 एप्रिल असा सलग चार दिवस ’फुले आंबेडकर जयंती महोत्सव-2022’ नांदेड येथे आयोजित केला. आज भीमजयंती दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे ’भीम पहाट’ हा सांस्कृतिक प्रबोधन कार्यक्रम तसेच पूजनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीत ’महा बुद्ध वंदना’ हा अभिनव उपक्रम घेऊन महापुरुषांना आदरांजली अर्पण केली.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथील ’महा बुद्धवंदना’ पूज्य भदंत पंय्या बोधी थेरो  आणि भिक्खू संघाच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात पार पडली. यावेळी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक मोरे, पोलीस उप अधीक्षक देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपविभागीय अधिकारी माने, तहसीलदार किरण अंबेकर, वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. संघरत्न कुर्‍हे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी संयोजक इंजि. प्रशांत इंगोले यांनी भिख्खू संघ आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. ’भीम पहाट’ हा संगीतमय कार्यक्रम सुप्रसिद्ध निवेदक प्रा. अविनाश नाईक यांनी सादर केला.

 वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड शहरातील महात्मा ज्योतिराव फुले पुतळ्याजवळ दिनांक 11 एप्रिल पासून ’फुले आंबेडकर जयंती महोत्सव- 2022’ ची सुरुवात झाली. महात्मा फुले जयंती दिनापासून सलग तीन दिवस सुप्रसिद्ध गायक भीमशाहीर आनंद कीर्तने, सुप्रसिद्ध गायक जी.के. वने आणि झाली भीम सकाळ फेम अंकुशराज चित्ते या नामवंत कलावंतांनी दररोज सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे महापुरुषांना आदरांजली अर्पण केली. ’फुले आंबेडकर जयंती महोत्सव-2022’ च्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. संतोष वाठोरे, कनिष्क सोनसळे, रावण साम्राज्य महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रमुख काकासाहेब डावरे, यशवंत थोरात, शुभम खंदारे, संघा खंदारे, शरद सूर्यवंशी, सिद्धार्थ भेदे, संजय निवडंगे प्रा. इंगोले, जयदीप पैठणे, प्रशांत गोडबोले आदींनी पुढाकार घेतला. सलग चार दिवस विविध उपक्रमांनी जयंती महोत्सव साजरा केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या संयोजकांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.


No comments:

Post a Comment

Pages