मोकाट जनावरांच्या उपद्रवाने नागरीक त्रस्त; कार्यवाहीसाठी मुख्याधिकारी यांना निवेदन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 9 May 2022

मोकाट जनावरांच्या उपद्रवाने नागरीक त्रस्त; कार्यवाहीसाठी मुख्याधिकारी यांना निवेदन

ता. प्र. किनवट :-

किनवट शहरात वाळुंचे दळण  वळण करण्यासाठी गाढवाचे मालक गाढवांचा सर्रार्स वापर करतात व गाढवांचा वापर करून त्यांना रस्त्यावर मोकाट सोडुन जातात यांचाच नाहक त्रास किनवट येथील वयोवृध्द महिला , बालके, शालेय विद्यार्थी यांना या बाबींचा सामना करावा लागतो नुकतेच काल दोन दुचाकी वाहक जात असतांना दोन गाढव सुसाट पळत अचानक समोर आल्याने दोघांनाही मुक्का मार लागला अशा प्रकारे जर नाजुक जागी मार लागल्यास नागरीकास जीवस मुकावे लागेल याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरीक करीत आहे तरी अशा प्रकारे मोकाट गाढव सोडणाऱ्या मालकावर कठोर कार्यवाही करून मोकाट गाढवांना कोंडवाडयात डांबुन योग्य ती कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते राजेश पाटील व टिपुसुलतान ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम, युवा पॅंथर निखिल कावळे यांनी नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे यांना दिले आहे व एक प्रतिलिप मा.तहसिलदार कार्यालय किनवट यांना सादर केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages