नगरपरिषदांच्या प्रारुप प्रभाग रचनेवर आक्षेप, हरकती, सूचना असल्यास 14 मे पर्यत सादर कराव्यात - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 9 May 2022

नगरपरिषदांच्या प्रारुप प्रभाग रचनेवर आक्षेप, हरकती, सूचना असल्यास 14 मे पर्यत सादर कराव्यात - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड  दि. 9 :-  जिल्ह्यातील कंधार, मुखेड, देगलूर, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, भोकर, मुदखेड व हदगाव नगरपरिषदांच्या प्रारुप प्रभाग रचनेवर ज्या कोणत्याही व्यक्तींचे आक्षेप / हरकती / सूचना असल्यास त्यांनी कारणासह संबंधित नगरपरिषदांच्या मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात मंगळवार 10 मे ते शनिवार 14 मे 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत लेखी सादर कराव्यात. शनिवार 14 मे रोजी दुपारी 3 वाजेनंतर आलेले आक्षेप / हरकती / सूचना विचारात घेतली जाणार नाहीत. याची सर्व संबंधितानी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 


राज्य निवडणूक आयोगाच्या 6 मे 2022 रोजीच्या पत्रान्वये माहे मे 2020 ते मार्च 2022 मध्ये मुदत संपलेल्या नांदेड जिल्ह्यातील कंधार, मुखेड, देगलूर, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, भोकर, मुदखेड व हदगाव या नगरपरिषदांच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारीत प्रभाग रचना कार्यक्रम-2022 जाहीर केला आहे. 


या कार्यक्रमानुसार नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली संबंधित नगरपरिषदेची प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे (महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 10 नुसार) रहिवाशांच्या माहितीसाठी संबंधित नगरपरिषद कार्यालयात उपलब्ध आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. 


No comments:

Post a Comment

Pages