राष्ट्र सेवा दलाच्या वतीने उद्यापासून पाच दिवसीय निवासी " विज्ञान,साहस व छंद",शिबिराचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 7 May 2022

राष्ट्र सेवा दलाच्या वतीने उद्यापासून पाच दिवसीय निवासी " विज्ञान,साहस व छंद",शिबिराचे आयोजन


किनवट,दि.७ : राष्ट्र सेवा दलाच्या वतीने उद्यापासून(ता.८) पाच दिवसीय निवासी " विज्ञान,साहस व छंद",शिबिराचे कोठारी(ता. किनवट),पेट्रोल पंपा समोरील साने गुरुजी एमर्जन्सी आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे     आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे यांनी दिली.

  इयत्ता ८वी,९वी व १० वीच्या मुला-मुलींसाठी याशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात एक दिवस संपूर्ण विज्ञान मेळावा, एक दिवस शासकीय कार्यालयांना अभ्यास भेट,एक दिवस जंगल भ्रमंती व एक दिवस लेखक,कवी व अधिकारी यांची प्रकट मुलाकात होणार आहे.

  शिबिरात दररोज दोरीवर चढणे,आगिवरून उडी मारणे, ईत्यादी मैदानी साहसिक खेळ,झांज,लेझीम व न्रत्य यासह कवायती,चित्रकला,मातीकाम, कोलाज ईत्यादी चे छंदवर्ग, दैनंदिन लेखन,समता,बंधुता, लोकशाही, राष्ट्रीय एकात्मता, वैज्ञानिक द्रष्टिकोण या विषयावर बौद्धिक सत्रे होतील.सर्व खेळ व प्रशिक्षणे पुण्याचे खास प्रशिक्षक देतील.शिबिरात मुला -मुलींची स्वतंत्र व सुरक्षित निवासी व्यवस्था करण्यात आली आहे.

मुला -मुलिंच्या पालकांनी आपल्या मुला -मुलिंना चांगले नागरिक बनविण्यासाठीच्या प्रक्रियेत भर घालण्यासाठी या शिबिरात सहभागी करावे,असे आवाहन भारत जोडो युवा अकादमी,राष्ट्र सेवा दल व साने गुरुजी रुग्णालय परिवाराच्या वतीने करणयात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages