किनवट, (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंजी येथे 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शाळेत ध्वजारोहणानंतर सकाळच्या रम्य प्रहरी इयत्ता पहिलीत दाखल होणार्या नवागतांना सजविलेल्या ट्रॅक्टरमध्ये बसवून वाद्ये वाजवीत बालकांची गावात वाजत गाजत प्रभात फेरी काढून शाळापूर्व तयारी मेळावा अनोख्या पद्धतीने पार पाडून,इयत्ता पहिलीला प्रवेश पात्र मुलांची नोंदणी केली
शिक्षणाचा कायदा मोफत आणि सक्तीचे शिक्षण याचे सार्वत्रिकरण व्हावे आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहचावे, या उदात्त हेतूने शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परीक्षण परिषद पुणे यांनी केले आहे. मिरवणुकी दरम्यान “शाळेत पाठवा, शाळेत पाठवा, आपल्या मुलांना शाळेत पाठवा,” अशा घोषणा देण्यात आल्या. ध्वजारोहणास आणि शाळा पूर्व तयारी मेळाव्यामध्ये आंजी गावातील सर्व पालक आणि गावकरी यांनी उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र रमेशराव चौधरीसह शिक्षक शशिकांत कांबळे, नव्यानेच रुजू झालेल्या ग्रामसेविका एस. आर. गंड्रतवार, गावच्या सरपंच रेणुकाबाई रणमले, अंगणवाडी सेविका सीताबाई मडावी, पोलीस पाटील धरमसिंह चायल, शाळेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चरणसिंह चायल, गोपाल कर्हाळे पाटील, मारोती रणमले, साहेबराव शेळके, बालाजी कर्हाळे पाटील, रमेश जाधव, संतोष साखरे, भगवान कांबळे,उत्तम जगले,अनिल जाधव, विजय राठोड, रामराव मुकाडे, संघपाल कांबळे, संभाजी पुसाम, विश्वनाथ मेश्राम, रुक्मिणी कौर चायल, सुमित्रबाई पुसाम आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
No comments:
Post a Comment