तीन दशकांपासून प्रलंबित कोठारी पुलाचे काम सुरू होणार आ.केराम यांच्या पाठपुराव्याला यश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 6 May 2022

तीन दशकांपासून प्रलंबित कोठारी पुलाचे काम सुरू होणार आ.केराम यांच्या पाठपुराव्याला यश

किनवट,  (प्रतिनिधी) :    आ. भीमराव केराम यांचे निकराचे प्रयत्न व पाठपुराव्यातून तब्बल तीन दशकांपासून प्रलंबित असलेल्या कोठारी पुलासाठी 3 कोटी 24 लाखाची निविदा अखेर प्रकाशित झाली असून, 16 मे रोजी प्रत्यक्ष कामास सुरूवात होणार असल्याचे माहिती आ. केराम यांच्या ‘लोकार्पण’ या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली.


   किनवट तालुक्यातील मदनापूर, शनिवारपेठ, प्रधानसावंगी, येंदा, पेंदा,  कोपरा, पारडी, कुपटी व बोधडीसह जवळपास 20 ते 25 गावांची सप्लाय लाईन म्हणून महत्वपूर्ण असलेला व या गावांना थेट जोडणार्‍या कोठारी येथील पुलाची मागणी मागील तीन दशकांपासून सातत्याने सुरू होती. मात्र मागील लोकप्रतिनिधींच्या उदासिन धोरणामुळे ही मागणी कायम दुर्लक्षितच राहिली होती. या मार्गावरून वहिवाट करणार्‍या जनतेसाठी खासकरून पावसाळ्याच्या दिवसांत तर तारेवरची कसरत होतीच शिवाय या पुलावर अपघाताच्या आणि पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्याही घटना ताज्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परिसरातील जनतेने भीमराव केराम यांची भेट घेऊन पुलाच्या कामाविषयीची मागणी केली होती. त्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत आ. केराम यांनी आश्वासन देखील दिले होते.


   दरम्यान निवडणुकांनंतरच्या विधानसभेच्या अधिवेशनात आ. केराम यांनी ही प्रलंबित समस्या लावून धरत सभागृहात  प्रश्न उपस्थित केला. त्याची दखल घेऊन या पुलाच्या कामासंदर्भात तब्बल 3 कोटी 24 लक्ष रूपयाच्या कामाचे टेंडर प्रकाशित झाले असून, येत्या 15 मे पर्यंत निविदा व 16 मे रोजी आ. केराम यांच्या हस्ते प्रत्यक्ष या पुलाच्या कामाला सुरूवात होणार असल्याचे, आ. केराम यांचे लोकार्पण या जनसंपर्क कार्यालयाच्या अधिकृत सूत्रांकडून समजले.

No comments:

Post a Comment

Pages