किनवट,ता.१८: वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नांदेड येथे सत्यशोधक फाऊंडेशन व मानव विकास सेवाभावी संशोधन संस्था यांच्या वतीने आयोजित साहित्य संमेलनात अभियंता भरतकुमार कानिंदे यांना वामनदादा कर्डक जन्मशताब्दी समाजभूषण पुरस्कार नुकताच जाहीर झाल्याने सर्वत्र त्यांचा गौरव होत आहे.
शासकीय सेवा तत्परतेने व निष्ठेने बजावणारे अधिकारी व आंबेडकरी आंदोलनातील सामाजिक, सांस्कृतिक व धम्मचळवळ गतिमान करण्यासाठी धडपणारे व समाजासाठी भरीव योगदान देणारे कृतिशील कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. विद्यार्थी दशेत शासकीय वसतीगृहातील समस्या निवारणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टलर्स असोसिएशनची (बाहा ) त्यांनी स्थापना केली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागात रुजू झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअरिंग (बानाई) यामध्येही ते सक्रीय होते. असे अभियंता भारतकुमार खंडूजी कानिंदे यांना उल्लेखनिय कार्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. शनिवारी (ता. २१ ) सकाळी ठीक ११ वाजता कुसुम सभागृह, नांदेड येथे मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभि. भीमराव धनजकर, अभि. मधुकर एम.कांबळे, अभि. यशवंत गच्चे, अभि. वसंत वीर, अभि. मिलिंद गायकवाड, अभि. डी. डी. भालेराव, अभि. सम्राट हाटकर, एस. टी. पंडीत, रोहिदास कांबळे, बी. जी. पवार, टी. पी. वाघमारे, रेल्वे प्रबंधक देवीदास भिसे, अनिल आठवले, यांच्या सह डॉ. भीमराव कांबळे, रंगराव नरवाडे, दयानंद तारु, मिलिंद कदम, महेंद्र नरवाडे, उत्तम कानिंदे, इकबाल शेख, उत्तम नरवाडे, प्रताप कऱ्हाळे, श्रीपाद पांडवे, डॉ. नागोराव लोणे, प्रा. डॉ. अशोक कंधारे, रमेश हटकर, मधुकर गिरगावकर, प्रा. डॉ. डी. एन. गोखले, अशोक कोल्हे,एड.मिलिंद सर्पे आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment