किनवट,दि.१९: लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचे गाणे वाजविणे बंद करा व हींदी गाणे लावा,आम्हाला नाचायचे आहे असे म्हणत एका समाजाच्या १० जणांनी मागासवर्गीय असलेल्या चार जणांना फायटरने मारुन जखमी केले.त्यापैकी एक जण गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी त्याला नागपूरला पाठविण्यात आले आहे.
ही घटना बुधवारी(दि.१८)रात्री पावने नऊ वाजता समता नगर येथिल संजय भरणे यांच्या घरासमोर व अभय नगराळे यांच्या घरात घडली.या प्रकरणात एका समाजाच्या १०जणांनी या प्रकरणातील साक्षिदारास फायटरने मारून जखमी केले.तसेच घरी जाऊन सांगितले या कारणावरून गैर कायद्याची मंडळी जमा केली व या प्रकरणातील फिर्यादी व साक्षिदार हे अनुसूचित जाती-जमातीचे असल्याचे माहीत असुनही हातात लोखंडी रॉड,पाईप,दगड व फायटर घेऊन घरात घुसून फिर्यादी व साक्षिदारांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांना जबरी दुखापत केली.तसेच अश्लील व जातीवाचक शिविगाळ करुन गंभीर जखमी केले.
या प्रकरणात गंभीरपणे जखमी झालेले राहुल भगत यांना पुढील उपचारासाठी नागपूरला संदर्भित करण्यात आले आहे. या प्रकरणी सुधाकर रामा भगत(वय५२),धंदा मिस्त्रि काम, राहणार समतानगर,किनवट यांच्या फिर्यादीवरून पोलिस उपनिरीक्षक गणेश पवार यांनी भादवी व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करून घेतला आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे हे करीत आहेत.दरम्यान,या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ,तर उर्वरित आठ आरोपी हे फरार आहेत.
हल्ला करणार्यांची नावे नाहीत बातमी मध्ये
ReplyDelete