उस्मानाबाद उपकेंद्र येथे स्वतंत्र विद्यापीठ करण्यासाठी षड्यंत्र करणाऱ्या संजय निंबाळकर यांना रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने फासले काळे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 27 May 2022

उस्मानाबाद उपकेंद्र येथे स्वतंत्र विद्यापीठ करण्यासाठी षड्यंत्र करणाऱ्या संजय निंबाळकर यांना रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने फासले काळेऔरंगाबाद :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उस्मानाबाद उपकेंद्र येथे स्वतंत्र विद्यापीठ करण्याची मागणी करणाऱ्या व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर ह्यांना आज रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम ह्यांनी व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहाबाहेर काळे फसण्यात येऊन विद्यापीठ विभाजनाचा घाट घालणाऱ्यांचा निषेध करण्यात आला.

आज व्यवस्थापन परिषदेच्या बैठकी नंतर निंबाळकर यांना काळे फासत कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध केला. यावेळी निषेध करणारे कार्यकर्ते म्हणाले की, "उस्मानाबाद उपकेंद्र येथे स्वतंत्र विद्यापीठ करून नामांतर शहिदांच्या बलिदानाचा अवमान व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांच्या कडून होत आहे त्यामुळे हा निषेध आम्ही दर्शवला आहे" असे निषेधकर्ते म्हणाले.

ह्यावेळी गुणरत्न सोनवणे,पवन  पवार,मनीष नरवडे,सचिन गायकवाड, राहुल वडमारे आदी कार्यकर्त्यानी जोरदार आंदोलन केले.No comments:

Post a Comment

Pages