नांदेड ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल अन्ड कल्चरल मुहमेंट नांदेड व महाराष्ट्र बहुजन शिक्षक व र्कमचारी संघटना यांच्या सयुक्त विधमाने प्रमोद गजभारे प्रस्तुत बुद्ध पहाट या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या जय्यत तयारी झाली आहे.उद्दाच्या या होणार्या कार्यक्रमास प्रसिद्ध सुफी गायीका जाधव सिस्टर्स हजेरी लाऊन गायीकी सादर करणार आहेत..
विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त मागील तेरा वर्षापासून आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीत आपले आगळे वेगळे स्थान निर्माण करणारा नांदेड येथील बुद्ध पहाट हा बुध्द-भिम गितांचा सांस्कृतीक कार्यक्रम उद्दा दिनांक 16 मे रोजी पहाटे ठीक पाच वाजता कै.डाॅ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे आयोजीत करण्यात आला आहे. मागील दोन वर्ष कोवीडच्या काळातही कार्यक्रम बंद नकरता शासनाच्या नियमाचे पालन करुन फेसबुक ऑनलाईन लाईव्ह कार्यक्रम करण्यात आला यास देश-विदेश पातळीवर लाखो लोकांनी प्रतिसाद दिला आहे.बुध्दपहाट कार्यक्रम हा राज्यभर लोकप्रिय असून या कार्यक्रमात आता पर्यंत शिने जगतातले नामवंत प्रसिद्ध गायक, गायीकांनी हजेरी लावली आहे.यावर्षी अनेकांच्या मागणीनुसार प्रसिद्ध गायीका विजया जाधव व विनया जाधव प्रसिद्ध जाधव सिस्टर्स ह्या या वर्षी बुध्द पहाट या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. यंदाच्या कार्यक्रमाचे मुख्य वैशीष्ट म्हणजे तथागत भगवान बुध्द यांच्या जन्मा पासुन ते महापरीनिर्वाणा पर्यतच्या त्यांच्या जिवनपटा वरील गिताचे साजरी करण होणार आसुन या कार्यक्रमात कुठली रेकाॅडेड गिताचे साजरी करण होणार नाही हि विशेष बाब उद्दाच्या कार्यक्रमाची भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावर्षीच्या कार्यक्रमास स्वागत अध्यक्ष स्थानी आंबेडकरी चळवळीचे लोकनेते व मार्गर्दशक सुरेशदादा गायकवाड आसणार आहेत तर उदघाटक म्हणुन जिल्हाधिकारी डाॅ.विपिन इटणकर यांची उपस्थीती आसुन प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकूर-घुगे, प्रजावाणीचे संपादक गोर्वधन बियाणी यांची प्रमुख उपस्थीती आसणार आहे.
बुद्ध पहाटचे संस्थापकीय अध्यक्ष रोहिदास कांबळे,कार्याध्यक्ष टि.पी.वाघमारे, उपाध्यक्ष दत्ताहरी धोत्रे, डी. जी. ढवळे ,वसंत सोनकांबळे, गायकवाड,सहसचिव दिनेश सूर्यवंशी, यशवंत कांबळे,कोषाध्यक्ष बालाजी कांबळे,सहकोषाध्यक्ष शेख नजीर, नागोराव ढवळे ,डी .टी .हनुमंते तर सल्लागार पत्रकार प्रकाश कांबळे, रविंद्र संगणवार ,सुरेश गजभारे, रवी गायकवाड,शिलरत्न चावरे,राजरत्न पवार, इंजि. भारत कानिंदे, भीमराव धनजकर, अरुण केसराळीकर ,राजकुमार स्वामी,संयोजन समिती सदस्य भगवान गायकवाड, पंडित आढाव, धर्मेंद्र कांबळे, काळबा हनमंते, संघरत्न चिखलीकर,संजय रत्नपारखी, प्रसिद्धीप्रमुख सुभाष लोणे यांच्यासह चळवळीतील अनेकजण कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी परिश्रम घेत असून धम्म बांधवांनी सहभागी व्हावे असे कार्यक्रमाचे संयोजक प्रमोद गजभारे ,रोहीदास कांबळे प्रसिध्दी प्रमुख सुभाष लोणे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळवीले आहे.
No comments:
Post a Comment