किनवट,ता.२५ (बातमीदार) तालुक्यातील नऊ मंडळापैकी सात मंडळात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. किनवट व बोधडी मंडळात मात्र हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला आहे. शुक्रवारी (ता.२४) सकाळी संपलेल्या २४ तासात तालुक्यात एकूण २४१.६ मि.मी. पाऊस कोसळला आहे. त्याची सरासरी २६.८४ मि.मी.आहे.
बुधवारी सकाळी घेतलेली किनवट तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे आहे. कंसात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय एकूण पावसाची नोंद दिलेली आहे. किनवट- ५.८(१३३.० मि.मी.); बोधडी- ३.८(९२.० मि.मी.); इस्लापूर- १४.८ (१७४.९ मि.मी.); जलधरा- २४.८ (१५०.४ मि.मी.); शिवणी- ३२.५ (१६४.१ मि.मी.); मांडवी- ४१.८ (१०९.३ मि.मी.); दहेली- ५२.५(११६.९ मि.मी.), सिंदगी मो. २३.८ (९५.५ मि.मी.); उमरी बाजार ४१.८ (१२४.१ मि.मी.).
तालुक्यात एक जूनपासून नऊ मंडळात मिळून आजपर्यंतचा पडलेला एकूण पाऊस १,१६०.२० मि.मी.असून, त्याची सरासरी १२८.९१ मि.मी.आहे. आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक पाऊस शिवणी मंडळात झाला असून, सर्वात कमी बोधडी मंडळात झालेला आहे. तालुक्याची जून महिन्यातील शुक्रवारी (ता.२४)पर्यंत पडणारा अपेक्षित सरासरी पाऊस १५१.६ मि.मी.असून, त्या तुलनेत ८५ टक्के पाऊस पडलेला आहे. तालुक्यातील नदी,नाले वहाते झाले आहेत,मात्र अजूनही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.
No comments:
Post a Comment