फरार 11 सागी तस्करांच्या शरणांगतीसह 70 हजार रुपयांचे अवैध सागवान जप्त - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 25 June 2022

फरार 11 सागी तस्करांच्या शरणांगतीसह 70 हजार रुपयांचे अवैध सागवान जप्त

किनवट,दि.25(प्रतिनीधी) :  सिरमेट्टीमार्गावरून  शुक्रवारी (दि.24) पहाटे  अवैध सागवानाची तस्करी करून आणणार्‍या चौदा व्यक्तींपैकी दोन तस्करांना सागवानासह जेरबंद करण्यात आले होते. त्यांची कसून चौकशी केली असता,   फरार झालेल्या बारा व्यक्तींची नावे समोर आल्यानंतर त्यापैकी अकरा जणांनी वनविभागासमोर शरणांगती पत्करून कार्यालयात हजर झाले.


      त्यांच्यावर रीतसर कार्यवाही केल्यानंतर नियम व अटी शर्तीच्या अधीन राहून त्यांना सोडण्यात आले. चौकशीमध्ये आरोपींनी सदरील अवैध सागीमाल शहरातील रामनगर भागामध्ये असलेल्या एका फर्निचर दुकानामध्ये पोहोचवायचे होते, असे सांगितल्यानंतर त्या फर्निचरच्या दुकानाची तपासणी केली असता, त्यामध्ये सुमारे 60 ते 70 हजार रुपयांचा माल  आढळून आल्यामुळे तोही माल जप्त करण्यात आला. मात्र फर्निचरचा मालक पळून जाण्यात यशस्वी झाला.


  या कार्यवाहीत नांदेडचे उपवनसंरक्षक  वाबळे,सहाय्यक वनसंरक्षक जी.डी. गिरी  यांच्या मार्गदर्शनाखाली किनवटचे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक)  पी. एल. राठोड तसेच नवनियुक्त वन परिमंडळ अधिकारी एस. एम. कोंपलवार, वनरक्षक एस. एन. सांगळे, जी. टी. माझळकर,टी. आर. घोडके वनरक्षक फिरते पथक, लेखापाल एम. जे. गंगलवाड, चिखलीचे वनपाल  एम. एन. कत्तूलवार,अंबाडीचे वनपाल बी. एस. संतवाले वनपाल, नीचपूरचे वनपाल एस. एम. यादव, वनरक्षक पी.के. मुळे, एस.एम.वैद्य, कर्तव्यदक्ष महिला वनरक्षक पी.के. माहुरे,कोमल मरस्कोल्हे, वनसेवक भाऊसिंग जाधव, शेख रफीक, लिंगा पेंदोर, मारुती पाटील गरडे, वाहन चालक बाळकृष्ण आवले यांचा सहभाग होता.

No comments:

Post a Comment

Pages