प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पत्रकारांने अपघातग्रस्त व्यक्तीला दिले जीवदान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 24 June 2022

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पत्रकारांने अपघातग्रस्त व्यक्तीला दिले जीवदान

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील किनवट- माहुर रस्त्यावर अय्यपा स्वामी मंदीराजवळ अज्ञात इसमाचा अपघात झाला ही बातमी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे किनवट तालुका उपाध्यक्ष राजेश पाटील तात्काळ घटनास्थळी पोहचले व रुग्णवाहिका गाडीला फोन करून बोलावून घेतले व घटनास्थळी जमलेल्या लोकांच्या मदतीने अपघात झालेल्या व्यक्तीला रुग्णवाहिकामध्ये बसवून अपघात झालेल्या रुग्णास गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातग्रस्त व्यक्तीचा जीव वाचला असून ते सुखरूप आहेत. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे किनवट तालुका उपाध्यक्ष राजेश पाटील यांनी रिस्क घेऊन अपघातग्रस्त व्यक्तीला जीवदान दिल्यामुळे संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य महिलाध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, सर्व राज्य व विभागीय पदाधिकारी, मराठवाडा संपर्क प्रमुख सुर्यकांत तादलापूरकर, कार्याध्यक्ष हुकुमत मुलाणी, मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव, नांदेड जिल्हाध्यक्ष संजयकुमार गायकवाड, किनवट तालुकाध्यक्ष आशिष शेळके संघटनेचे सर्व पदाधिकारी व सभासदांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages