अवघड परिस्थितीत प्रगती पेट्रोल पंप प्रगती एकूण नफा ९०लाख तर ५३ लाख रूपये निव्वळ नफा मनपा उपायुक्त अर्पणा थिटे यांची माहिती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 28 June 2022

अवघड परिस्थितीत प्रगती पेट्रोल पंप प्रगती एकूण नफा ९०लाख तर ५३ लाख रूपये निव्वळ नफा मनपा उपायुक्त अर्पणा थिटे यांची माहिती

औरंगाबाद : पेट्रोल पंप चालविणे अवघड काम आहे.अवघड परिस्थितीतही पेट्रोल पंप यशस्वीरित्या चालवून एका वर्षात एकूण नफा ९० लाख, तर ३५ लाख आणि इतर १८ लाख असा निव्वळ नफा ५३ लाख रुपये झाला . यामध्ये महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांचे मोठे योगदान आहे.त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रगती पेट्रोल पंपाची प्रगती  होऊ शकली. या प्रगती पेट्रोल पंपाची प्रगती बघून लवकर आणखी चार पेट्रोल सूरू करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका आयुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले.

महानगरपालिकेच्या वतीने जसवंतपूरा येथील प्रगती पेट्रोल पंपाला आज मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने प्रगती पेट्रोल पंपाचा छोट्याखानी प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता डी के पंडित यांनी केले. यावेळी बोलताना उपायुक्त अपर्णा थेटे म्हणाले की, पेट्रोल पंप चालवणे अवघड काम आहे. पेट्रोल पंप सुरू करण्यापासून आतापर्यंत अनेक अडचणी आल्या परंतु त्या अडचणींना सामोरे जात पेट्रोल पंप यशस्वीपणे चालवला आहे. दरम्यानच्या काळात पेट्रोल दर वाढीचे चढ-उतार त्यामुळे काही अडचणी आल्या. अडचणीवर मात करत पेट्रोल पंप यशस्वीपणे चालवून आय वो सी एल च्या ऑडिट मध्ये पेट्रोल पंप ला ए प्लस रँक मिळाला आहे.याबदल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले  महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आमच्यावर विश्वास टाकला. वेळोवेळी मार्गदर्शन केले त्यामुळे उत्पन्न वाढले. कर्मचाऱ्यांनी अडचणीच्या काळात चांगले सहकार्य केले. या पेट्रोल पंपाचे उत्पन्न अधिकाधिक वाढ होण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी स्मार्ट सिटी च्या वतीने चालवण्यात येणाऱ्या बसेसचा पेट्रोल भरण्यासाठी करार केला आहे. ही एक आनंदाची बाब आहे. प्रशासकांचे मार्गदर्शन व विश्वासामुळे प्रगती पेट्रोल पंपाची यशस्वी प्रगती झाली. कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्तम रित्या  काम केल्याबद्दल उपायुक्त अपर्णा थेटे यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या समारंभाला मनपा अभियांत्रिकी विभागाचे उपअभियंता अमोल कुलकर्णी, स्मार्ट सिटी चे पवनीकर, आय ओ सी एल चे मॅनेजर गंगवाल, वार्ड अभियंता वसंत भोये, वार्ड अधिकारी गिरी, प्रगती पेट्रोल पंपाचे मॅनेजर स्वप्निल पाटील ,प्रगती पेट्रोल पंपाचे सुपरवायझर अर्पित खंडेलवाल, पेट्रोल पंपाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages