बिलोली
जय भोसीकर :
दिनांक २६ जून २०२२ रोजी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा मुंबई शहरातील सांस्कृतिक सभागृहात थाटात संपन्न झाला.
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या वतीने दादर येथील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून राजस्तरीय गुणीजण गौरव महासमेलनात सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कुंडलवाडी येथील पत्रकार,नगरसेवक प्रतिनिधी हर्ष कुंडलवाडीकर यांना राज्यस्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील २५ क्षेत्रांतून पुरस्कारासाठी निवडलेल्या मानकऱ्यांना या सोहळ्यात मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय तसेच राष्ट्रस्तरीय पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आले. सुप्रसिद्ध इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन डॉ. जयलक्ष्मी सानिपीना राव या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून ऑनलाईन उपस्थित होत्या. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही घटनाकारांनी दिलेली संविधानमूल्ये गुणिजनांनी प्राणपणाने जपावीत, असे आवाहन संस्थापक अध्यक्षांनी आपल्या बीजभाषणात केले. सुप्रसिद्ध समाजसेविका आणि समुपदेशिका सौ. मिनाक्षी गवळी या समारंभाच्या मार्गदर्शक होत्या. समारंभाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध प्रेरक वक्त्या सौ. मनिषा कदम यांनी केले. गुणिजन परिवाराचे पदाधिकारी श्री. प्रकाश सावंत, श्री. लक्ष्मणराव दाते, श्री. अमोलराव सुपेकर यावेळी उपस्थित होते. कुंडलवाडीकर यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment