बिलोली ,जय भोसीकर:
पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष व बिलोली तालुक्याचे भूमिपुत्र महेंद्र गायकवाड यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणीजण गौरव महासंमेलनात दादर येथील दादर माटुंगा सांस्कृतीक सभागृहात आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार 2022 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे व संबंध जिल्ह्यात अनेक पत्रकार घडविणारे पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष व बिलोली सारख्या ग्रामीण भागातून गेल्या अनेक वर्षांपासून निर्भीड लिखाण करणारे पत्रकार महेंद्र गायकवाड यांच्या कार्याचा गौरव नुकताच मुबंई येथे करण्यात आला आहे.
गेल्य दोन् दशका पासून पत्रकारितेत निर्भीड लिखाण करून समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देणारे व संबंध जिल्हात अनेक पत्रकारांना घडविणारे चारोळीच्या माध्यमातून व्यंगात्मक लिखाण करणारे पत्रकार महेंद्र गायकवाड यांना नुकताच आदर्श पत्रकार दर्पण रत्न पुरस्काराने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 26 जून रोजी मंबईत सन्मानित करण्यात आले.त्यांना मिळालेलेल्या राज्यस्तरीय पुरस्काराचे अनेकांनी सोशल मीडियावर स्वागत करून शुभेच्छा दिल्या असून बिलोलीचे माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी ,माजी नगराध्यक्षा सौ.मैथिली संतोष कुलकर्णी, जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते मंगेशभाऊ कदम, पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोदभाऊ पत्रे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील , माजी नगराध्यक्ष नागनाथ तुंमोड, माजी उपाध्यक्ष मारोती दादा पटाईत, रणवीरसिंह चौहान, भाऊ बिलोलीकर, कुंडलवाडीचे माजी उपनगराध्यक्ष अशोक कांबळे, मिलिंद भाऊ कोलंबीकर, अभिजित् तुडमे, जेष्ठ पत्रकार रत्नाकर जाधव, राजेंद्र कांबळे,शिवराज रायलवाड, माजी नगरसेवक प्रकाश पोवाडे, गंगाधर पुपलवार , उदय् चौहान, डॉ.मनोज शंखपाळे,यासिन बेग इनामदार, खलील पटेल,मौलाना अहेमद बेग इनामदार, पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हासचिव शशिकांत पाटील,नकुल जैन, सादिक पटेल, माधव मेघमाळे,शेख रसूल ,अरविंद पवनकर,विकास पानकर, संतोष पानकर,सुनील भास्करे, दिपक सल्लावार, विशाल शिवलाड, बंडू जाधव यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment