जिल्हा रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 21 June 2022

जिल्हा रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न

नांदेड  दि. 21:-  आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.आय.भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय प्ररीचर्या प्रशिक्षण केंद्र व आयुष विभागाच्योवतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. 


कार्यक्रमांचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संतोष शिरसिकर यांचे हस्ते धन्वंतरी प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आले. यानंतर योगप्रशिक्षक श्रीमती राणी दळवी  यांनी  विविध योगासन व प्राणायाम यांची प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांना योगा दिनाचे धडे दिले. तसेच सर्वांनी नियमित योग साधनेवर भर द्यावा असेही त्या यावेळी म्हणाल्या. 


या कार्यक्रमास  जिल्हा आयुष अधिकारी डॉ. संदेश जाधव, सहाय्यक जिल्हा आयुष अधिकारी डॉ.जव्वाद  खान, शासकीय प्ररीचर्या प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रेणुकादास मैड, डॉ. कैलास चव्हाण, एल टी तुमोड, रानोळकर, छाया कदम, अपर्णा जाधव, अर्चना भोसले तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुवर्णकार सदाशिव यांनी केले. आभार प्रदर्शन गायकवाड बालाजी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी परिश्रम घेतले.No comments:

Post a Comment

Pages