क्रांतीसूर्याची सावली' संगितमय मैफिलीत रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध! स्मृतिदिनानिमित्त दिली माता रमाईस क्रांतीसुरांची संगीतमय मानवंदना झी युवा संगित सम्राट फेम अजय देहाडे यांच्यासह सुप्रसिद्ध गायकांनी जिंकली रसिकांची मने..! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 3 June 2022

क्रांतीसूर्याची सावली' संगितमय मैफिलीत रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध! स्मृतिदिनानिमित्त दिली माता रमाईस क्रांतीसुरांची संगीतमय मानवंदना झी युवा संगित सम्राट फेम अजय देहाडे यांच्यासह सुप्रसिद्ध गायकांनी जिंकली रसिकांची मने..!

नांदेड- दक्षिण मतदार संघातील सोनखेड मुक्कामी 'क्रांतीसूर्याची सावली' या कार्यक्रमामध्ये झी युवा संगित सम्राट फेम अजय देहाडे यांच्यासह सुप्रसिद्ध गायकांनी विविध भीमगीते गात रसिकांची मने जिंकली. माता रमाई स्मृतिदिनानिमित्त क्रांतीसुरांची संगीतमय मानवंदना देतांना रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलिपभाऊ कंदकुर्ते होते. नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक नांदेड रमेशभाऊ गोडबोले, नगरसेवक सुरेश हाटकर , प्रशांत इंगोले वंचित बहुजन आघाडी नेते, संजय भोकरे कौठेकर भीमशक्ती, सुनील खिल्लारे भीमशक्ती नांदेड , प्रशांत गोडबोले रिपब्लिकन सेना युवा जिल्हा अध्यक्ष, अंकुश माने सामाजिक कार्यकर्ते,  सुषमा ताई थोरात सामाजिक कार्यकर्त्या, दगडगाव सरपंच प्रकाश नवरे, वाहेगावचे मा.सरपंच लोभाजी गवारे, आंबेसांगवीचे  सरपंच दयानंद डुबे, राजेश पावडे भाजपा नांदेड दक्षिण, बोरगाव सरपंच बाळासाहेब घाटोळ, रवी भोकरे, आष्टुर सरपंच दत्तराव ससाणे, दगडगाव राजेश उराडे, बापुराव ढवळे, जवळा माजी सरपंच कैलास गोडबोले, विलास गजभारे भिमकायदा सामाजिक संघटना जिल्हा अध्यक्ष, पो.नि.ए. टि. एस. भुजंग गोडबोले, स.पो.नी. विशाल भोसले, आपले सरकार जि. व्यवस्थापक शुद्धोधन लोणे,

स्वागताध्यक्ष बाळूभाऊ सातोरे यांची उपस्थिती होती. 


         'बुद्ध,फुले,शाहू,आंबेडकर विचार मंच' आयोजित, शाहीर विनोद गोडबोले प्रस्तुत 'क्रांती सूर्याची सावली' त्यागमूर्ती माता रमाई महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून तसेच बुद्धजयंती व महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'क्रांती सूर्याची सावली' या कार्यक्रमाचे सादरकर्ते  'झी' युवा संगीत सम्राट फेम- अजय देहाडे, दूरदर्शन सूरसागर फेम- पियुष वासनिक, सुप्रसिद्ध गायक निवेदक हर्षद कांबळे, सुप्रसिद्ध गायक निवेदक चेतन चोपडे, सुप्रसिद्ध गायक लोककलावंत विनोद गोडबोले यांनी क्रांती सुरांची मानवंदना दिली. यात दोनच राजे ईथे गाजले, माउलीची माया होता माझा भिमराया,

मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी, काळजावर कोरलं नाव आमच्या भिमा कोरेगाव,

शान से चली मेरे भिमराज की सवारी, नाचो गावो और खुशियॉं मनावो आई भिम जयंती निराली, भिमा तुज प्रणाम कोटी कोटी,

 हातावर नाव मी रमाचं गोंदते, परिवर्तनाचा वामन भुकेला गात गात आला वामन गात गात गेला,‌ एका चेहऱ्यात नऊ कोटी चेहरे रमा ऐसी बिलोरी मिळाली... या गाण्यांनी रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. 


     मानवंदनेस सोनखेडचे लोकनियुक्त सरपंच  अच्युत मोरे, उपसरपंच प्रवीण मोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेशराव मोरे, शिवसेना तालुका अध्यक्ष बाबुराव मोरे, माजी जि. प.‌ कृषी सभापती श्रीनिवास बंडेवार, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी डॉ. कालिदास मोरे , माजी उपसरपंच सुनील भाऊ मोरे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा जि अध्यक्ष लक्ष्मण मोरे, अक्षय मोरे, शिवाजीराव मोरे उद्योजक, पांडुरंग देसाई, कृष्णा मोरे, सुरेश मोरे ,विलास बंडू भाऊ मोरे, माधवराव मोरे, अजीम पटेल वंचित नेते, तुकाराम खिल्लारे, अशोक गोड, सामाजिक कार्यकर्ते सुहास मोरे, सोपान मोरे, अशोक मोरे, जिलानी शेख, फौजी श्रीखंड मोरे, राम मोरे युवा सेना, रामकिसन वड, आश्रफ शेख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.



मोठ्या संख्येने उपस्थित मान्यवरांचे, प्रमुख पाहुण्यांचे व परिसरातील सर्व अनुयायांचे आभार संयोजन समितीच्या पदाधिकारी यांनी मानले. संयोजन समितीचे राहुल खिल्लारे, आकाशवाणी प्रा.निवेदक आनंद गोडबोले, नंदकुमार ससाने, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम खिल्लारे,प्रकाश धुतराज, सुनील धुतराज, रोहिदास भोरगे, अमोल धुतराज, पप्पू सूर्यवंशी, टीबी खिलारे, सचिन खिल्लारे, मिलिंद धुतराज, ऋषी खिलारे यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages